यंत्रमागधारकांच्या समस्यांसाठी समिती

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा-राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठीचे काम समिती करणार आहे. समितीत माजी मंत्री प्रकाश आवाडे व सुभाष देशमुख, विधानसभा सदस्य रईस शेख, अनिल बाबर यांच्यासह विधान परिषद सदस्य प्रवीण दटके हे सदस्य आहेत, तर राज्य यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे समितीचे सदस्य सचिव असतील. तसेच राज्यातील ज्या विभागात समिती पाहणी दौरा करेल, त्या विभागातील संबंधित प्रादेशिक उपायुक्त (वस्त्रोद्योग) तेथील समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
समितीची कार्यकक्षा
-राज्यातील यंत्रमागबहुल भागातील संघटनांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने त्यांच्या समस्यांचा अभ्यास करणे.
-यंत्रमागबहुल भागातील समस्यांबाबत यंत्रमागधारकांच्या विविध संघटना/फेडरेशनशी चर्चा करणे.
-यंत्रमागबहुल भागातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना शासनास सादर करणे.
-वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज सवलत योजनेंतर्गत यंत्रमागधारकांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणे.
-यंत्रमाग घटकांसाठी अल्पकालीन उपाययोजना सुचविणे.
-शासनाच्या यंत्रमागासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास त्यानुसार बदल प्रस्तावित करणे.
हेही वाचा :
Pune : कोंढव्यातील दफनभूमीचा ठराव रद्द करावा : आयुक्तांना निवेदन
Yavatmal News: मोबाईल हरविल्याच्या वादातून सहकाऱ्याचा खून
Maratha Reservation Protest | आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, २० जानेवारीला मुंबईकडे चला-मनोज जरांगे-पाटील
Latest Marathi News यंत्रमागधारकांच्या समस्यांसाठी समिती Brought to You By : Bharat Live News Media.
