निज्जर हत्या प्रकरणातील संशयितांना कॅनडा पोलीस करणार अटक?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि कॅनडा यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेल्‍या खलिस्‍तानी दहशतवादी (Sikh separatist)  हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणी कॅनडा पोलीस दोन संशयितांना एका आठवड्यात अटक करू शकतात, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. ( Sikh separatist Hardeep Singh Nijjar killing case )  Sikh separatist : दोन्ही संशयित कॅनडामध्येच असल्‍याचा पोलिसांचा दावा कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या … The post निज्जर हत्या प्रकरणातील संशयितांना कॅनडा पोलीस करणार अटक? appeared first on पुढारी.

निज्जर हत्या प्रकरणातील संशयितांना कॅनडा पोलीस करणार अटक?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि कॅनडा यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेल्‍या खलिस्‍तानी दहशतवादी (Sikh separatist)  हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणी कॅनडा पोलीस दोन संशयितांना एका आठवड्यात अटक करू शकतात, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. ( Sikh separatist Hardeep Singh Nijjar killing case )
 Sikh separatist : दोन्ही संशयित कॅनडामध्येच असल्‍याचा पोलिसांचा दावा
कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही संशयितांचा कॅनडामध्‍येच मुक्‍काम आहे. स्‍थानिक पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. जून २०२३ मध्‍ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
कॅनडाच्या पंतप्रधानांनी केले होते भारतावर आरोप
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सप्टेंबर २०२३ मध्‍ये निज्जर हत्या प्रकरणी कॅनडाच्या संसदेत निवेदन जारी केले होते. निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असल्याचा धक्‍कादायक आरोप केला होता. भारताने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. बुधवारी कॅनडाच्या पोलिसांनी सांगितले की, आरोप निश्चित झाल्यानंतर निज्जर हत्याकांडातील कथित संशयितांच्या सहभागाबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. निज्जर हत्याकांडावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले होते की, “कॅनडाने केवळ आरोप केले आहेत. भारताला अद्याप कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत.”
हेही वाचा : 

Who was Hardeep Singh Nijjar | कोण होता हरदीप सिंग निज्जर? ज्याच्या हत्येमुळे भारत-कॅनडात तणाव
India and US Meet | अमेरिकेचा ट्रूडोंना धक्का! भारत-अमेरिका बैठकीत निज्जर हत्येबाबत कोणतीही चर्चा नाही

 
 
The post निज्जर हत्या प्रकरणातील संशयितांना कॅनडा पोलीस करणार अटक? appeared first on Bharat Live News Media.