Sports News : मार्चमध्ये रंगणार वरिष्ठ राज्य कबड्डी स्पर्धा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 71 व्या राज्य वरिष्ठ पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक हरिदास चरवड, असोसिएशनचे सहकार्यवाह बाबूराव चांदेरे, पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दत्ता कळमकर, संजय पायगुडे यांनी पत्रकार … The post Sports News : मार्चमध्ये रंगणार वरिष्ठ राज्य कबड्डी स्पर्धा appeared first on पुढारी.

Sports News : मार्चमध्ये रंगणार वरिष्ठ राज्य कबड्डी स्पर्धा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 71 व्या राज्य वरिष्ठ पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक हरिदास चरवड, असोसिएशनचे सहकार्यवाह बाबूराव चांदेरे, पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दत्ता कळमकर, संजय पायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही स्पर्धा दि. 3 ते 7 मार्चदरम्यान वडगाव येथील शिंदे मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत 25 जिल्ह्यांचे अ व ब दर्जाप्राप्त महापालिका हद्दीतील ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहर असे पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी 31 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पारितोषिक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे चांदेरे यांनी सांगितले.
या स्पर्धेत पुरुषांमध्ये अस्लम इनामदार, आकाश शिंदे, शंकर गदई, आदित्य शिंदे, आरकम शेख, प्रणव राणे, मयूर कदम, सौरभ कुलकर्णी, शशांक साहिल, अक्षय सूर्यवंशी, तेजस पाटील, विराज लांडगे, विशाल ताठे आदी तर महिलांमध्ये हरजित कौर, कोमल देवकर, पूजा यादव, आम्रपाली गलांडे, मंदिरा कोमकर, सलोनी गजमल, मनीषा राठोड, दिव्या गोगावले, रेखा सावंत खेळणार असून, या स्पर्धेतून महाराष्ट्राचा पुरुष आणि महिलांचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात येणार असल्याचे दत्ता कळमकर यांनी सांगितले.
हेही वाचा

थर्टी फर्स्ट : अवैध पार्ट्या, बनावट मद्य ‘उत्पादन शुल्क’च्या रडारवर
Nashik News : रसवंतिगृहांसाठी शहरात २५ जागा निश्चित, महापालिकेकडून लिलावाची नोटीस जारी
कचरा प्रकल्प बंदवरून पालिकेत वाद; मा. आमदाराचे प्रशासनाला खडे बोल

Latest Marathi News Sports News : मार्चमध्ये रंगणार वरिष्ठ राज्य कबड्डी स्पर्धा Brought to You By : Bharat Live News Media.