उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता पुरस्कार डॉ. नितु पाटील यांना जाहीर

जळगांव – इंडियन मेडिकल असोसिएशन नवी दिल्ली येथील डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्र मधून ‘आएमए राष्ट्रीय अध्यक्ष उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता” हा पुरस्कार वासुदेव नेत्रालय वरणगावंचे संचालक माता नर्मदा परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांना जाहीर झाला आहे. संपूर्ण “भारतातून डॉ. नितु पाटील हे पहिले IMA डॉक्टर” ज्यांनी पायी माता नर्मदा परिक्रमा सलग 108 दिवसांत 3609 किलोमीटर अंतर … The post उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता पुरस्कार डॉ. नितु पाटील यांना जाहीर appeared first on पुढारी.

उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता पुरस्कार डॉ. नितु पाटील यांना जाहीर

जळगांव – इंडियन मेडिकल असोसिएशन नवी दिल्ली येथील डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्र मधून ‘आएमए राष्ट्रीय अध्यक्ष उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता” हा पुरस्कार वासुदेव नेत्रालय वरणगावंचे संचालक माता नर्मदा परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांना जाहीर झाला आहे.
संपूर्ण “भारतातून डॉ. नितु पाटील हे पहिले IMA डॉक्टर” ज्यांनी पायी माता नर्मदा परिक्रमा सलग 108 दिवसांत 3609 किलोमीटर अंतर पार करून यशस्वी केली. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्रातील विविध इंडिअन मेडिकल असोसिएशनच्या संघटनेने सत्कार केले आहेत. आता राष्ट्रीय इंडियन मेडिकल असोसिएशनचा बहुमूल्य पुरस्कार डॉ. नितु पाटील यांना जाहीर झाला आहे.
तिरुअनंतपुरं, केरळ याठिकाणी 98 वी राष्ट्रीय इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. त्याठिकाणी माता नर्मदा परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा बहुमूल्य पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.नितु पाटील यांचे संपूर्ण मेडिकल असोसिएशन द्वारे कौतुक होत आहे.
हेही वाचा :

कचरा प्रकल्प बंदवरून पालिकेत वाद; मा. आमदाराचे प्रशासनाला खडे बोल
Nashik Police : अभिप्राय, सूचनांसाठी नाशिक पोलिसांकडून व्हॉट्सअप क्रमांक
त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना दणका; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Latest Marathi News उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता पुरस्कार डॉ. नितु पाटील यांना जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.