ससूनमध्ये वैद्यकीय बिल मंजुरीसाठी लाच घेणारा लिफ्टमन जाळ्यात
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ससून हॉस्पिटलमधील उपअधीक्षक कार्यालयात आलेली वैद्यकीय बिले मंजूर करून देतो, असे सांगून लोकांकडून लिफ्टमनच 2 टक्के लाच मागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून 3 हजारांची लाच घेताना या लिफ्टमनला पकडले. जालिंदर चंद्रकांत कुंभार (वय 55) असे या लिफ्टमनचे नाव आहे. याबाबत एका 57 वर्षांच्या नोकरदाराने 1 लाख 43 हजार रुपयांचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी 1 जूनमध्ये सादर केले होते. बिल मंजूर व्हावे यासाठी तक्रारदार हेलपाटे मारत होते.
जालिंदर कुंभार हे लिफ्टमन असले, तरी शिपायासारखे काम करतात. ते लोकांकडून बिले घेऊन ती मंजूर करून देतो, असे सांगून लोकांकडून 2 टक्के लाच घेत होते. तक्रारदार यांनाही त्यांनी 3 हजार रुपयांची लाच मागितली. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची 29 व 30 नोव्हेंबर तसेच 18 व 19 डिसेंबर रोजी पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी ससून हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तक्रारदाराकडून लाच घेताना कुंभार याला सापळा रचून पकडले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले, हवालदार नवनाथ वाळके, सरिता वेताळ, प्रवीण तावरे, चंद्रकांत कदम यांनी ही कारवाई केली. बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
Pune News : पीएमपीएमएला हजार कोटी संचलन तूटीची झळ
Nashik News : नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय
‘डीपीसी’च्या निधीवरून भाजप अस्वस्थ!
Latest Marathi News ससूनमध्ये वैद्यकीय बिल मंजुरीसाठी लाच घेणारा लिफ्टमन जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.