मागोवा 2023 : उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक, पीएमपीचे चाक रूतले!

पुणे : मेट्रोचा वाढलेला मार्ग, विमानांची देशांतर्गत पाच नवी उड्डाणे, लोहगाव विमानतळावर झालेले नवे कार्गो टर्मिनल, रेल्वेमार्गाचे पूर्ण झालेले विद्युतीकरण आणि पीएमपीएमएलच्या ताफ्यात डबल डेकरची भर पडण्याची चर्चा आदी महत्त्वाच्या घडामोडी पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या वर्षात घडल्या. पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीमध्ये उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असून दर महिन्यांला हजार बस ब्रेकडाऊन होत आहेत. एकंदरीत … The post मागोवा 2023 : उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक, पीएमपीचे चाक रूतले! appeared first on पुढारी.

मागोवा 2023 : उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक, पीएमपीचे चाक रूतले!

प्रसाद जगताप

पुणे : मेट्रोचा वाढलेला मार्ग, विमानांची देशांतर्गत पाच नवी उड्डाणे, लोहगाव विमानतळावर झालेले नवे कार्गो टर्मिनल, रेल्वेमार्गाचे पूर्ण झालेले विद्युतीकरण आणि पीएमपीएमएलच्या ताफ्यात डबल डेकरची भर पडण्याची चर्चा आदी महत्त्वाच्या घडामोडी पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या वर्षात घडल्या. पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीमध्ये उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असून दर महिन्यांला हजार बस ब्रेकडाऊन होत आहेत. एकंदरीत 2023 मध्ये शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
वाहनचालकांच्या दबावामुळे बीआरटी मार्ग काढून टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पीएमपीएमएलने वर्षाच्या सुरुवातीला बसगाड्यांना लागणार्‍या आगी रोखण्यासाठी एफडीएसएस (फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टिम) बसवली. त्यामुळे बसला रस्त्यातच लागणार्‍या आगीच्या घटना रोखण्यात यश आले. मात्र, ब्रेकडाऊनमुळे महिन्याला 1 हजारापर्यंत बस बंद पडत आहेत. त्या रोखण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला पाहिजे. तसेच, सरत्या वर्षात ताफ्यातील जुन्या तथा आयुर्मान संपलेल्या बस भंगारात काढल्या आहेत. पीएमपीएमएलच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने दोन्ही महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासन यांच्या संचलन तुटीवर पीएमपीएमएलला अवलंबून राहावे लागणार आहे.
पुणेकरांनी पहिल्यांदाच मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेगाडीचे पुणे स्थानकावर जंगी स्वागत केले. पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा प्रस्ताव असून, नवीन 7 मजली इमारत, त्यात आलिशान प्रतीक्षालय उभारण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला मंजुरीसाठी पाठविण्यात आला. रेल्वे स्थानकावरील यार्ड रिमॉडलिंगच्या कामाची 2023 मध्ये जोरदार चर्चा झाली. याशिवाय पुणे विभागातील सर्व 531 किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. 1929 पासून या कामाला सुरुवात झाली होती, 2023 मध्ये त्याचा शेवट झाला. एसटी महामंडळाने ताफ्यातील जुन्या बस भंगारात काढण्यात आल्या असून, नवीन बस घेण्यात सुरुवात केली.
यात नवी लालपरी, ई-शिवाई, नवीन हिरकणी, ई-शिवनेरी, ई-लालपरी, नवीन स्लीपर (शयनयान) यांसारख्या नव्या बस ताफ्यात दाखल झाल्या. यामुळे आणि शासनाने प्रवाशांसाठी सुरू केलेल्या महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतीच्या योजनांनी एसटीचे प्रवासी वाढले, त्यासोबतच उत्पन्नात वाढदेखील झाली. दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणार्‍या रॅपिडो (बाईक टॅक्सी) या कंपनीला पुण्यात बंदी केली. पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्यासाठी येथे आरटीओकडून वायुवेग पथकाद्वारे 24 तास गस्त सुरू करीत बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा

एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोटाने विमाननगर हादरले; जीवितहानी नाही
दुर्दैवी ! आईसमोर चिमुरड्याचा डंपरखाली सापडून मृत्यू
‘डीपीसी’च्या निधीवरून भाजप अस्वस्थ!

Latest Marathi News मागोवा 2023 : उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक, पीएमपीचे चाक रूतले! Brought to You By : Bharat Live News Media.