Accident : दुचाकींच्या अपघातात दोघांचा मृत्यू; एकजण जखमी

पुणे : मद्यप्राशन केलेल्या दुचाकीस्वार तरुणाने समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, एक सहप्रवाशी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.25) रात्री दहाच्या सुमारास गगन अधिरा सोसायटीजवळ, भावडी रोड, वाघोली परिसरात घडली. राहुल मोहन डुकळे (वय 19,रा.गायरान गोरेवस्ती, वाघोली), रावसाहेब सिद्धाजी माने (वय 21,रा.रामनगर, लोणीकंद) अशी मृत्यू झालेल्या … The post Accident : दुचाकींच्या अपघातात दोघांचा मृत्यू; एकजण जखमी appeared first on पुढारी.

Accident : दुचाकींच्या अपघातात दोघांचा मृत्यू; एकजण जखमी

पुणे : मद्यप्राशन केलेल्या दुचाकीस्वार तरुणाने समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, एक सहप्रवाशी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.25) रात्री दहाच्या सुमारास गगन अधिरा सोसायटीजवळ, भावडी रोड, वाघोली परिसरात घडली.
राहुल मोहन डुकळे (वय 19,रा.गायरान गोरेवस्ती, वाघोली), रावसाहेब सिद्धाजी माने (वय 21,रा.रामनगर, लोणीकंद) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी, लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस कर्मचारी बबन गिरमे यांनी फिर्याद दिली आहे. राहुल डुकळे हा मद्यप्राशन करून साथीदारासोबत दुचाकीवरून निघाला होता. तर रावसाहेब माने हा त्याच्या दुचाकीवरून निघाला होता. त्या वेळी डुकळे याने माने याच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली.
हेही वाचा

अरे व्वा ! पुणेकर आता होताहेत आंतरराष्ट्रीय वाहनचालक
कोल्हापूर : लक्षतीर्थमधील अनधिकृत मशिदीवरून राडा
मुंबईतील चुनाभट्टीमधील खून प्रकरणातील बंदुका पेणच्या चुनाभट्टी नदीत

 
Latest Marathi News Accident : दुचाकींच्या अपघातात दोघांचा मृत्यू; एकजण जखमी Brought to You By : Bharat Live News Media.