मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करावे : डॉ. अरविंद नातू यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नागरिकांनी चिकित्सक वृत्तीने निसर्गाचे निरीक्षण करून त्यामधून सतत अध्ययन करीत राहावे. स्वतःला का? कधी? कसे? असे प्रश्न विचारत राहावे, असे म्हणून त्यांनी मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करावे, असे मत आयसर येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू व्यक्त केले. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात … The post मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करावे : डॉ. अरविंद नातू यांचे मत appeared first on पुढारी.

मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करावे : डॉ. अरविंद नातू यांचे मत

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नागरिकांनी चिकित्सक वृत्तीने निसर्गाचे निरीक्षण करून त्यामधून सतत अध्ययन करीत राहावे. स्वतःला का? कधी? कसे? असे प्रश्न विचारत राहावे, असे म्हणून त्यांनी मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करावे, असे मत आयसर येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू व्यक्त केले. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात डॉ. नातू यांचे ’निसर्ग आणि विज्ञान’ या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे उपस्थित होते.
विविध राज्यातील प्राध्यापकांनी विज्ञान प्रदर्शनाबाबत सुरू असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. यामध्ये हिमाचल प्रदेश येथील डॉ. हेमंत कुमार, चंदीगडचे मनू शर्मा, नागालँडचे श्रीमती विसेतोनुओ अंगमी, मणिपूरचे ओनिनाम सिंग, आसामचे नितुल दास, बिहारचे कृष्णा कुमार, झारखंडच्या प्रीती मिश्रा, अंदमान- निकोबारचे राजेश कुमार, लडाखचे युसूफ अली आदींनी सहभाग घेतला.
प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी 2 हजार 700 विद्यार्थी आणि 140 शिक्षकांनी भेट दिली. संचालक येडगे कराड येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे प्रदर्शन दि. 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे. अधिकाधिक नागरिक, शिक्षक, विद्यार्थी व विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन येडगे यांनी केले आहे.
हेही वाचा

अरे व्वा ! पुणेकर आता होताहेत आंतरराष्ट्रीय वाहनचालक
कोल्हापूर : लक्षतीर्थमधील अनधिकृत मशिदीवरून राडा
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आले तरी जाणार नाही : शरद पवार

Latest Marathi News मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करावे : डॉ. अरविंद नातू यांचे मत Brought to You By : Bharat Live News Media.