जालना : मोटासायकल अपघातात सातोन्यातील तरुण ठार, तर दोन जखमी

परतूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : सातोना – सेलू रोडवर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रॅक्टरवर मोटासायकल आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर दोन जण जखमी झाले आहेत. परसराम बाबासाहेब काटे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार परसराम काटे, विष्णू मस्के आणि योगेश पवार हे तिघे जण सेलू कडून सातोन्याच्या दिशेने येत असताना सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पावडे हदगाव पाटीजवळ रस्त्याच्याकडेला उभा असलेल्या ट्रॅक्टरवर मोटार सायकल धडकून हा अपघात झाला. या अपघातात जखमी परसराम काटे याला उपचारासाठी परभणी येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मयत परसराम काटे हा सातोना येथील पेपर वाटप एजसी चालक बाबासाहेब काटे याचा तो मुलगा होत. या तरुणाच्या अपघाती निधनाच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Latest Marathi News जालना : मोटासायकल अपघातात सातोन्यातील तरुण ठार, तर दोन जखमी Brought to You By : Bharat Live News Media.
