मुंबईतील चुनाभट्टीमधील खून प्रकरणातील बंदुका पेणच्या चुनाभट्टी नदीत

पेण; पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथील चुनाभट्टीमध्ये गोळीबार होऊन झालेल्या गँगवॉरमध्ये एकाची हत्या झाली होती. या प्रकरणाचे धागेदोरे पेण पर्यंत पोहोचले असून या गँगवॉर मधील काही हत्यारे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई चुनाभट्टी येथील आझाद गल्लीत व्ही. एन. पुरव मार्ग येथे दुपारी दोनजण दुचाकीवरून आले होते. या दोघांनी गजबजलेल्या वस्तीत … The post मुंबईतील चुनाभट्टीमधील खून प्रकरणातील बंदुका पेणच्या चुनाभट्टी नदीत appeared first on पुढारी.

मुंबईतील चुनाभट्टीमधील खून प्रकरणातील बंदुका पेणच्या चुनाभट्टी नदीत

पेण; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई येथील चुनाभट्टीमध्ये गोळीबार होऊन झालेल्या गँगवॉरमध्ये एकाची हत्या झाली होती. या प्रकरणाचे धागेदोरे पेण पर्यंत पोहोचले असून या गँगवॉर मधील काही हत्यारे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई चुनाभट्टी येथील आझाद गल्लीत व्ही. एन. पुरव मार्ग येथे दुपारी दोनजण दुचाकीवरून आले होते. या दोघांनी गजबजलेल्या वस्तीत अचानक अंदाधुंद गोळीबार केला होता. यावेळी १६ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळीबारात आठ वर्षांच्या मुलीसह चारजण गंभीर जखमी झाले होते. या गोळीबारात पॅरोलवर सुटलेल्या पप्पू ऊर्फ सुमित येरुणकर याची हत्या करण्यात आली. सुमित ऊर्फ पप्पू येरुणकर याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला आहे.
या गँगवॉर प्रकरणी मुंबई पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी या हत्याकांडामध्ये वापरलेले हत्यारे मुंबई-गोवा महामार्गवरील पेण तालुक्यातील दुरशेत गावाजवळ असलेल्या चुनाभट्टी गावाच्या पुलाखाली नदीत टाकल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस, पेण पोलीस व दादर सागरी पोलिसांनी केला असता त्यांना दोन पिस्तूल आढळून आले आहेत. या गँगवॉर मध्ये वापरलेल्या हत्यारांची संख्या अधिक असल्याचा संशय पोलिसांना असल्याने पुलाखाली व नदी परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होते.
Latest Marathi News मुंबईतील चुनाभट्टीमधील खून प्रकरणातील बंदुका पेणच्या चुनाभट्टी नदीत Brought to You By : Bharat Live News Media.