जळगाव : ‘दिगंबरा..दिगंबरा’च्या..जयघोषात रावेर येथे श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव

जळगाव : पुढारी वृत्तसेवा :  रावेर येथे श्रीदत्त जयंतीनिमित्त सुमारे १८५ वर्षाची अखंड परंपरा असलेला श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने आज (दि. २७) उत्साहात साजरा झाला. तत्पूर्वी मंगळवारी दत्त मंदिरात श्री गुरुदेवदत्त जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. तर आज श्रीदत्त गोपाळजींच्या रथाची महापूजा होवून ‘दिगंबरा.. दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषात रथ ओढण्यात आला. गुरुवारी (दि.२८)  श्रींच्या … The post जळगाव : ‘दिगंबरा..दिगंबरा’च्या..जयघोषात रावेर येथे श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव appeared first on पुढारी.
जळगाव : ‘दिगंबरा..दिगंबरा’च्या..जयघोषात रावेर येथे श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा :  रावेर येथे श्रीदत्त जयंतीनिमित्त सुमारे १८५ वर्षाची अखंड परंपरा असलेला श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने आज (दि. २७) उत्साहात साजरा झाला. तत्पूर्वी मंगळवारी दत्त मंदिरात श्री गुरुदेवदत्त जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. तर आज श्रीदत्त गोपाळजींच्या रथाची महापूजा होवून ‘दिगंबरा.. दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषात रथ ओढण्यात आला. गुरुवारी (दि.२८)  श्रींच्या पालखीचे महापूजन व दहीहंडी मिरवणूक निघणार आहे. Datta Jayanti 2023
रावेर शहर दत्त जयंती हिंदू धर्मातील एक महत्वाचे धार्मिक स्थान असल्याने नोकरी व काम धंद्यांनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी रथोत्सवानिमित्त आवर्जून गावाकडे परततात. दत्त जयंती निमित्त पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे हरी कृष्ण संकिर्तन होणार आहे.रावेर शहरात आज दत्त जयंती निमित्त आज बुधवारी केशवदास महाराज, शंकराचार्य महाराज,श्रीपाद महाराज,यांच्या प्रमुख उपस्थितीत रथाची विधीवत पूजा करत रथोत्सवाला सुरुवात झाली.शहरातील प्रमुख मार्गावरुन रथ ओढण्यात येतो.व त्यावर प्रसाद म्हणून रेवड्यांची उधळन करण्यात येते. यावेळी डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह,प्रभारी अधिकारी सतीष अडसुर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2023  : श्रीकृष्ण-दत्त रथोत्सवाला १८५ वर्षांची परंपरा
तब्बल १२ वर्ष अखंडपणे श्री क्षेत्र माहूर येथे श्री सचिदानंद स्वामींनी तप केल्यानंतर श्री दत्तप्रभूनी दर्शन देत त्यांना निर्गुण पादुका व पांढऱ्या रंगाचे निशाण तसेच छडी दिली होती. ते घेवून सचिदानंद स्वामींनी रावेर शहरातील नाला भागात सुमारे २१२ वर्षापूर्वी भव्य दत्त मंदिर उभारून त्या भाविकांच्या दर्शनार्थ ठेवल्या होत्या. तेव्हापासून मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला ‘श्रीकृष्ण-दत्त’ रथोत्सव काढण्याची अखंड १८५ वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे. १८३० च्या सुमारास श्री स्वामी सचिदानंद महाराजांनी तत्कालीन रावेर गावाच्या बाहेर असलेल्या नाल्याच्या काठी निर्जनस्थळी बस्तान उभारत कुंवरस्वामी महाराज, मस्तानशाहवली बाबा यांच्या सत्संगात दैवी अनुभूती घडवल्याची भाविकांची श्रद्धा आहे.१८३३ च्या सुमारास श्री दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली व स्वामींनी एका कासाराला पंचधातूचे प्रमाण व दृष्टांत घडवत एकमुखी दत्तप्रभुंची १७ इंच उंचीची मूर्ती घडवून प्रतिष्ठापना केल्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे.
श्री दत्त मंदिरातच घेतली समाधी
स्वामी सच्चिदानंद महाराजांनी वयाच्या १०८ व्या वर्षी भाद्रपद शु नवमीला सन १८८८ मध्ये श्री दत्त मंदिरातच संजीवन समाधी घेतली आहे.त्यांच्या परंपरेत दुसरे गादीपती म्हणून माधवनाथ महाराज,तिसरे गादीपती म्हणून केशवदास महाराज,चौथे गादीपती म्हणून भानुदास महाराज तर पाचवे गादीपती म्हणून श्रीपाद महाराज सेवारत आहेत. रथावरील श्रीकृष्ण मूर्ती व श्री दत्त प्रभूच्या निर्गुण पादुकांचे पूजन व सेवा बजावण्याची परंपरा राजगुरू परीवाराकडे आहे.
हेही वाचा 

जळगाव : केंद्र – राज्य सरकारच्या शेती धोरणांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई : वर्षभरात ५२ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
सुलवाडे- जामफळ प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करणार : गिरीश महाजन

 
Latest Marathi News जळगाव : ‘दिगंबरा..दिगंबरा’च्या..जयघोषात रावेर येथे श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव Brought to You By : Bharat Live News Media.