जम्मू-काश्मीर : संरक्षण मंत्र्यांनी घेतली पुंछमधील मृतांच्या नातेवाईकांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज (दि. २७) पुंछमध्ये सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. दरम्यान यावेळी त्यांनी पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. २१ डिसेंबर रोजी पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाचे ४ जवान शहीद झाले होते. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी … The post जम्मू-काश्मीर : संरक्षण मंत्र्यांनी घेतली पुंछमधील मृतांच्या नातेवाईकांची भेट appeared first on पुढारी.

जम्मू-काश्मीर : संरक्षण मंत्र्यांनी घेतली पुंछमधील मृतांच्या नातेवाईकांची भेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज (दि. २७) पुंछमध्ये सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. दरम्यान यावेळी त्यांनी पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
२१ डिसेंबर रोजी पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाचे ४ जवान शहीद झाले होते. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री आज राजौरीत दाखल झाले. दहशतवादी हल्ल्यानंतर २२ डिसेंबर रोजी भारतीय सुरक्षा दलाने शोध मोहिम राबवली होती. त्यावेळी ३ नागरिकांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तिघांचाही मृत्यू झाला. तिन्ही मृतांच्या नातेवाईकांची आज राजनाथ सिंह भेट घेतली.
लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे यांनीही पुंछला भेट देऊन या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्राणघातक दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आढावा बैठकही घेतली केली.
हेही वाचा

WFI New committee : भारतीय कुस्ती महासंघासाठी समितीची स्थापना; IOAचा निर्णय

Latest Marathi News जम्मू-काश्मीर : संरक्षण मंत्र्यांनी घेतली पुंछमधील मृतांच्या नातेवाईकांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.