टेस्ला कंपनीत रोबोच्या हल्ल्यात इंजिनिअर रक्तबंबाळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे भविष्यात रोबो आणि मनुष्य यांच्या संघर्ष निर्माण होऊ शकतो, अशी भीती अनेक वेळा व्यक्त केली जाते. अशी घटना अमेरिकेतील ऑस्टिन येथील टेस्ला कंपनीच्या फॅक्टरीत प्रत्यक्षात घडलेली आहे. हा प्रकार २०२१ला घडला होता, पण काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. (tesla robot attacks engineer) टेस्ला ही कंपनी एलन मस्क यांच्या मालकीची … The post टेस्ला कंपनीत रोबोच्या हल्ल्यात इंजिनिअर रक्तबंबाळ appeared first on पुढारी.

टेस्ला कंपनीत रोबोच्या हल्ल्यात इंजिनिअर रक्तबंबाळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे भविष्यात रोबो आणि मनुष्य यांच्या संघर्ष निर्माण होऊ शकतो, अशी भीती अनेक वेळा व्यक्त केली जाते. अशी घटना अमेरिकेतील ऑस्टिन येथील टेस्ला कंपनीच्या फॅक्टरीत प्रत्यक्षात घडलेली आहे. हा प्रकार २०२१ला घडला होता, पण काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. (tesla robot attacks engineer)
टेस्ला ही कंपनी एलन मस्क यांच्या मालकीची आहे. टेस्ला कंपनीची गिगा टेक्सास ही कंपनी ऑस्टिन परिसरात आहे. या कंपनीत टेस्ला कारच्या सुटे भाग जोडणीत रोबोटचा वापर करते. या ठिकाणी मनुष्यांवर रोबटवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. यातील एका रोबोकडे सुटे भाग योग्य ठिकाणी नेऊन ठेवण्याची काम आहे. या रोबोमध्ये काही बिघाड झाल्यानंतर याने तेथे असलेल्या एका अभियंत्यावर थेट हल्ला केला. या रोबोने या अभियंत्याला एका कोपऱ्यात ढकलेले आणि आणि पाठीत आणि हातावर पंजाने हल्ला चढवला, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे.  (tesla robot attacks engineer)
अमेरिकेतील फेडरल रेग्युलेटर त्यांचा अहवाल सादर करत असतात, त्या अहवालात या घटनेचा उल्लेख आहे. डेली मेल या वृत्तसंस्थेने या अहवालाने ही बातमी दिली आहे. या हल्ल्यात रोबोने या इंजिनिअरला उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तेथे उपस्थित असलेल्या अन्य दोघा इंजिनिअरनी आणीबाणीत वापरायची यंत्रणा कार्यन्वित करून या रोबोला थांबवले, पण तोपर्यंत जखमी इंजिनिअर काही फूट जाऊन पडला होता.
दक्षिण कोरियातीही घडली होती अशीच घटना
या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण कोरियात एका रोबोच्या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. एका कंपनीतील भाजी पॅकिंग करणाऱ्या विभागात रोबोटिक आर्म कार्यरत होते. या रोबोटिक आर्मनी एका कामगाराल कन्व्हेयर बेल्टवर चिरडले. त्यात या कामगाराचा मृत्यू झाला.
हेही वाचा

एलन मस्क यांचा रोबो करतो नृत्य, स्क्वॅट
मिका बनली जगातील पहिली रोबो सीईओ
रोबोने फळांच्या बॉक्सऐवजी पकडले माणसाला आणि…

Latest Marathi News टेस्ला कंपनीत रोबोच्या हल्ल्यात इंजिनिअर रक्तबंबाळ Brought to You By : Bharat Live News Media.