
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. (Sur Lagoo De Marathi Movie ) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत ‘सूर लागू दे’च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. (Sur Lagoo De Marathi Movie )
संबंधित बातम्या –
Prabhas Salaar : प्रभासच्या ‘सालार’चा हिंदी मार्केटमध्ये ९० कोटींचा गल्ला
The Batman Part II : बॅटमॅनचा खलनायक इतका गुप्त की, ‘चेहराही लपवून ठेवला’
Ananya Panday : ‘खो गए हम कहाँ’ नंतर अनन्याची खास पोस्ट, म्हणाली….
आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अश्विन पांचाळ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओज या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं आहे. चित्रपटात काय पाहायला मिळेल याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत.
रीना मधुकर प्रमुख भूमिकेत असून त्यांनी टेलिव्हिजन आणि हिंदी, मराठी सिनेमातून उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मेघना नायडू यांची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यापूर्वी मराठीसाठी गाणं करणाऱ्या मेघनाने या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच भूमिका साकारली असून या चित्रपटात मेघना पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.
विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, रीना मधुकर, मेघना नायडू यांच्यासह आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा ज्ञाते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.
Latest Marathi News विक्रम गोखलेंच्या ‘सूर लागू दे’ चित्रपटाचा ट्रेलर भेटीला Brought to You By : Bharat Live News Media.
