सांगली : विटा पालिकेतील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

विटा: पुढारी वृत्तसेवा: विटा पालिकेच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रक्कमेचा चेक काढण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना मिळकत व्यवस्थापकाला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई कराड रस्त्यावरील विटा हायस्कूल येथे आज (दि.२७) करण्यात आली. पुंडलिक हिरामण चव्हाण (वय ४९) असे मिळकत व्यवस्थापकाचे नाव आहे. Sangli News याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुंडलिक चव्हाण हा विटा … The post सांगली : विटा पालिकेतील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात appeared first on पुढारी.
सांगली : विटा पालिकेतील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

विटा: Bharat Live News Media वृत्तसेवा: विटा पालिकेच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रक्कमेचा चेक काढण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना मिळकत व्यवस्थापकाला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई कराड रस्त्यावरील विटा हायस्कूल येथे आज (दि.२७) करण्यात आली. पुंडलिक हिरामण चव्हाण (वय ४९) असे मिळकत व्यवस्थापकाचे नाव आहे. Sangli News
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुंडलिक चव्हाण हा विटा पालिकेत मिळकत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. विटा पालिकेतीलच त्याच्या एका सहकाऱ्याचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रक्कमेचा चेक काढण्यासाठी मृत सहकाऱ्याच्या मुलाकडे पुंडलिक चव्हाण सतत पैशाची मागणी करत होता. याबाबत संबंधित मुलाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० डिसेंबर रोजी तक्रार केली होती. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर, सलिम मकानदार, अजित पाटील, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, सीमा माने, उमेश जाधव, चालक वंटमुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. Sangli News
हेही वाचा 

सांगली : पतीच्या अनधिकृत बांधकामामुळे खानापूरच्या नगरसेविकेचे पद रद्द
सांगली : स्वतः च्या लोकप्रियतेसाठी अजित पवारांवर केलेली टीका खपवून घेणार नाही : पाटील
सांगली : जिल्ह्यात पडला ६६ जणांचा ‘मुडदा’!

Latest Marathi News सांगली : विटा पालिकेतील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.