
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : एम.फिल (मास्टर ऑफ फिलॉसॉफी) ही पदवी बंद करण्यात आली आहे. काही विद्यापीठे अद्याप नवीन अर्ज मागवत आहेत; परंतु ही पदवी बंद करण्यात आली आहे. आता एम.फिल ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याने या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांना दिला आहे. (MPhil not recognised degree anymore : UGC )
यूजीसीने स्पष्ट केले आहे की, यूजीसीने यापूर्वीच एमफिलची पदवी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पीएचडी पदवी पुरस्कारासाठी किमान मानके आणि प्रक्रिया नियमावली, 2022 तयार केली आहे. ही नियमावली 7 नोव्हेंबर 2022 रोजी भारताच्या राजपत्रात प्रकाशित झाली आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठांना एमफिल पदवीचे प्रवेश थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
यूजीसीने विद्यापीठांना आगामी शैक्षणिक वर्षासाठी एमफिल प्रवेश बंद करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना एमफिल प्रोग्राममध्ये प्रवेश न घेण्याचा सल्ला दिला. ‘यूजीसी’चे सचिव मनीष जोशी यांनी म्हटलं आहे की, “काही विद्यापीठे एम.फिल.साठी नव्याने अर्ज मागवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात, एम.फिल. ही पदवी ही मान्यताप्राप्त पदवी नाही हे निदर्शनास आणून दिले पाहिजे. यूजीसीचे नियमन (पीएचडी पदवी पुरस्कारासाठी किमान मानके आणि प्रक्रिया) विनियम 2022 चा क्रमांक 14 स्पष्टपणे नमूद करतो की उच्च शैक्षणिक संस्था एम.फिल ऑफर करणार नाहीत.”
UGC Letter regarding the discontinuation of M.Phil Degree as per clause 14 of University Grants Commission (Minimum Standards and Procedures for Award of Ph.D. Degree) Regulations, 2022
The university’s authorities are requested to take immediate steps to stop admissions to… pic.twitter.com/v6Gxf9kZnk
— UGC INDIA (@ugc_india) December 27, 2023
हेही वाचा :
फुटीरवाद्यांना दणका..! मसरत आलमच्या ‘मुस्लिम लीग’वर बंदी
पूंछमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळा, नागरिकांची मने जिंका : संरक्षण मंत्र्यांचे लष्कराला आवाहन
KL Rahul Record : केएल राहुलचे ऐतिहासिक शतक! ‘असा’ विक्रम करणारा पहिला भारतीय
Latest Marathi News ‘एम.फिल’ पदवी बंद, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये : ‘यूजीसी’चा इशारा Brought to You By : Bharat Live News Media.
