केएल राहुलचे ऐतिहासिक शतक! ‘असा’ विक्रम करणारा पहिला भारतीय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : KL Rahul Record : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार खेळी करत शतक झळकावले. सेंच्युरियनमध्ये त्याने 137 चेंडूत 73.72 च्या स्ट्राईक रेटने 101 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 4 षटकारही मारले. यासह, तो द. आफ्रिकेच्या मैदानावर एका डावात सर्वाधिक धावा फटकावणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.
राहुलने पंतला टाकले मागे (KL Rahul Record)
द. आफ्रिकेत कसोटी डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीत ऋषभ पंत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पंतने 2022 मध्ये नाबाद 100 धावा केल्या होत्या. आता राहुलने त्याचा विक्रम मोडला आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 2010 मध्ये 90 धावांची इनिंग खेळली होती. तर दीपदास गुप्ता (63 धावा, वर्ष 2001) आणि दिनेश कार्तिक (63 धावा, वर्ष 2007) संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.
राहुलची कसोटीतील कामगिरी (KL Rahul Record)
केएल राहुलने 2014 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 48 कसोटी सामन्यांच्या 82 डावांमध्ये 2,743 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 34.29 आणि स्ट्राइक रेट 52.22 राहिली आहे. कसोटीत त्याने 13 अर्धशतके आणि 8 शतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 आहे.
Latest Marathi News केएल राहुलचे ऐतिहासिक शतक! ‘असा’ विक्रम करणारा पहिला भारतीय Brought to You By : Bharat Live News Media.
