जमिनीवरच्या खेळातून माणूस खचत नाही : खा. हिना गावित

पिंपळनेर: (जि. धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा; सध्याची तरुणाई मोबाईलच्या आहारी गेली. त्याच्यात शारीरिक बदल होतात पण बौद्धिक वाढ होत नाही. अल्पवयात चष्मा का लागतो. टेक्नॉलॉजीचा दुष्परिणाम यातून बाहेर पडण्यासाठी भारतीय किसान मोर्चा तर्फे नमो जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा तळागाळात जाऊन काम करतो. कबड्डीच्या खेळातील यशाने हुरळून जाऊ नका, अपयशाने खचून जाऊ नका, जिंकणाऱ्या खेळाडूचे कौतुक करा, पराभव मोठ्या मनाने स्वीकारा. या जमिनीवरच्या खेळातून माणूस खचत नाही, उलट त्याच्यात चैतन्य व प्रेरणा निर्माण होते असे मौल्यवान मार्गदर्शन नमो जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी म.फुले विद्या प्रसारक संस्था संचलित माधव स्मृतिअनुदानित आश्रम शाळा सामोडे येथे खा. हिना गावित यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अॅड संभाजी पगारे यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, चंद्रजीत पाटील, जि.प.सदस्य विजय ठाकरे, खंडू कुवर, साहेबराव गांगुर्डे, गोकुळ परदेशी, सपोनि श्रीकृष्ण पारधी, तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, मंडल अध्यक्ष विकी कोकणी, प्रमोद गांगुर्डे, पिंपळनेर शहराध्यक्ष डॉ.राजेंद्र पगारे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विद्याधर पाटील, विजय गवळी, सविता पगारे, सुरेश शेवाळे, उमेश बोरसे, सुधीर अकलाडे, भुषण ठाकरे, दिनेश धायबर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अँड संभाजी पगारे यांनी खेळात खिलाडू वृत्तीची जोपासना झाली पाहिजे, हा स्पर्धेच्या आयोजना मागचा हेतू आहे, पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारा, जिंकणाऱ्या स्पर्धकाचे अभिनंदन करा असा सल्ला दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य झेड. एम.गवळी, मुख्या.प्रमोद जगताप, मनीष माळी, प्रा.जे.पी.सोनवणे, राजेद्र सावळे, योगेश वंदे, सचिन साळुंखे, गोरख पवार, एन.बी. बाघ, जी.बी.पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील 25 टिम सहभागी झाल्या. प्रथम बक्षीस अँड संभाजीराव पगारे 11000 रू पवनपुत्र क्रीडा क्लब काकसेवड यांना, द्वितीय बक्षिस हर्षवर्धन दहिते यांचेकडून जय खोड्यादेव कबड्डी संघ मोहांगी 7100 रू, तृतीय बक्षिस रामकृष्ण खलाणे यांचेकडून युवा क्लब दोंडाईचा 5100 रू, उत्तेजनार्थ बक्षिस इंजि.मोहन सूर्यवंशी यांचेकडून जय बजरंग संघ मापलगाव 3100 रु. या चार कबड्डी संघांनी पटकावली. बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
हेही वाचा :
बेळगाव : गळतगा येथे दुचाकीला चुकविताना बस नाल्यात उलटली; प्रवाशांसह दुचाकीस्वार जखमी
Jalgaon Murder : तमाशा बघण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा खून, पाचोरा तालुक्यातील घटना
Belgaum News : गळतगा येथे दुचाकीला चुकविताना बस नाल्यात उलटली; प्रवाशांसह दुचाकीस्वार जखमी
Latest Marathi News जमिनीवरच्या खेळातून माणूस खचत नाही : खा. हिना गावित Brought to You By : Bharat Live News Media.
