शेअर बाजारात तेजीचे वादळ! सेन्सेक्स ७२ हजार पार, निफ्टी २१,६६० वर

Bharat Live News Media ऑनलाईन : जागतिक बाजारातील तेजीचा मागोवा घेत आज (दि.२७) सेन्सेक्सने पहिल्यांदाच ७२ हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टी ५० ने पहिल्यांदाच २१,६६० वर झेप घेतली. दोन्ही निर्देशांकांचा हा नवा सर्वकालीन उच्चांक आहे. बाजारातील तेजीत बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर राहिले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७५० अंकांनी वाढून ७२,०९२ वर गेला. तर निफ्टीने २३० अंकांची वाढ नोंदवत २१,६६० वर व्यवहार केला. (Sensex Nifty hits record high)
अल्ट्राटेक सिमेंट टॉप गेनर
निफ्टी ५० निर्देशांक २१,४९७ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २१,६६० वर जात नवा उच्चांक गाठला. निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर ४ टक्के वाढून १०,४३३ रुपयांवर पोहोचला. हिंदोल्को, बजाज ऑटो हे शेअर्स प्रत्येकी सुमारे ४ टक्के आणि ३.५० टक्क्यांनी वाढले. टाटा मोटर्सचा शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढून ७३९ रुपयांवर पोहोचला. ग्रासीमचा शेअर २ टक्क्यांनी वाढून २,२१४ रुपयांवर गेला. तर एनटीपीसी, ओनजीसी, ब्रिटानिया हे शेअर्स घसरले.
सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, एसबीआय, एम अँड एम, इंडसइंड बँक, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एलटी, इन्फोसिस हे शेअर्स वाढले. तर एनटीपीसी, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले.
निफ्टी बँक निर्देशांकही वधारला
एनर्जी वगळता सर्व क्षेत्रांनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. निफ्टी बँक निर्देशांकाने प्रथमच १ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवून ४८,३०० चा टप्पा ओलांडला. ऑटोमोबाइल, फार्मा, मेटल आणि पीएसयू बँक निर्देशांक ०.५-१.३ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे, एफएमसीजी, आयटी आणि कॅपिटल गुड्स निर्देशांकात किरकोळ वाढ झाली.
जागतिक बाजार
फेडरल रिझर्व्ह मार्चपर्यंत व्याजदरात कपात करेल या आशेने अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक काल वधारुन बंद झाले होते. आशियाई बाजारातही आज सकारात्मक वातावरण राहिले. जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा एमएससीआय निर्देशांक ०.६५ टक्क्यांनी वाढला. जपानचा निक्केई (Nikkei) निर्देशांक १.२ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँगचा हँगसेंग (Hang Seng Index) ख्रिसमस सुट्टीनंतरच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात वर गेला. (Sensex Nifty hits record high)
तेलाच्या किमती
आज सुरुवातीच्या आशियाई व्यवहारात तेलाच्या किमती घसरल्या. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स ०.०५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ८०.८१ डॉलरवर आले. यूएस डब्ल्यूटीआय क्रूड फ्यूचर्स ०.२१ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७५.४१ डॉलरवर होते.
The post शेअर बाजारात तेजीचे वादळ! सेन्सेक्स ७२ हजार पार, निफ्टी २१,६६० वर appeared first on Bharat Live News Media.

Home महत्वाची बातमी शेअर बाजारात तेजीचे वादळ! सेन्सेक्स ७२ हजार पार, निफ्टी २१,६६० वर
शेअर बाजारात तेजीचे वादळ! सेन्सेक्स ७२ हजार पार, निफ्टी २१,६६० वर
पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील तेजीचा मागोवा घेत आज (दि.२७) सेन्सेक्सने पहिल्यांदाच ७२ हजारांचा टप्पा पार केला. तर निफ्टी ५० ने पहिल्यांदाच २१,६६० वर झेप घेतली. दोन्ही निर्देशांकांचा हा नवा सर्वकालीन उच्चांक आहे. बाजारातील तेजीत बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर राहिले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ७५० अंकांनी वाढून ७२,०९२ वर गेला. तर निफ्टीने २३० …
The post शेअर बाजारात तेजीचे वादळ! सेन्सेक्स ७२ हजार पार, निफ्टी २१,६६० वर appeared first on पुढारी.
