रूईछत्तीशीत सर्कल, भुयारी मार्ग बनवा; ग्रामस्थांकडून मागणीचे निवेदन

रुईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा : नगर-सोलापूर महामार्गावरून परिसरातील ग्रामस्थांना सुखकर प्रवास करता यावा, यासाठी रुईछत्तीशी, मठपिंप्री, अंबिलवाडी येथील ग्रामस्थांनी खासदार डॉ. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना निवेदन दिले. या मार्गाचा पहिला बाह्यवळण रस्ता रुईछत्तीशी येथून जातो. या रस्त्याला हातवळण, मठपिंप्री व परिसरातील गावांना जाण्यासाठी सर्व्हिस रोड ठेवण्यात आला नाही. तसेच रुईछत्तीशी येथे … The post रूईछत्तीशीत सर्कल, भुयारी मार्ग बनवा; ग्रामस्थांकडून मागणीचे निवेदन appeared first on पुढारी.

रूईछत्तीशीत सर्कल, भुयारी मार्ग बनवा; ग्रामस्थांकडून मागणीचे निवेदन

रुईछत्तीशी : Bharat Live News Media वृत्तसेवा : नगर-सोलापूर महामार्गावरून परिसरातील ग्रामस्थांना सुखकर प्रवास करता यावा, यासाठी रुईछत्तीशी, मठपिंप्री, अंबिलवाडी येथील ग्रामस्थांनी खासदार डॉ. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना निवेदन दिले. या मार्गाचा पहिला बाह्यवळण रस्ता रुईछत्तीशी येथून जातो. या रस्त्याला हातवळण, मठपिंप्री व परिसरातील गावांना जाण्यासाठी सर्व्हिस रोड ठेवण्यात आला नाही. तसेच रुईछत्तीशी येथे सर्कल बनविण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंबिलवाडी येथे भुयारी मार्गाची व्यवस्था करावी, यासाठी निवेदन देण्यात आले. महामार्ग सुसज्ज पद्धतीने तयार करण्यात आला, पण ग्रामीण जनतेला येणार्‍या अडचणी खासदार विखे आणि माजी मंत्री कर्डिले यांनी मार्गी लावाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. खासदार विखे व कर्डिले यांनी या जनेतेचे वाहतुकीचे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभिलाष घिगे, दादासाहेब दरेकर, रमेश भांबरे, बाळासाहेब मेटे, भरत भुजबळ, धनंजय खाकाळ, नाथा शेटे, केशव वाबळे, सचिन ढवळे, अंकुश नवसुपे, बबन गोरे, सचिन ढवळे आदी उपस्थित होते. रूईछत्तीशी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांची मोठी अडचण झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा

Nagar: पोलिस मित्रांची वारी..ठाण्याच्या दारी!
बारामतीतील दहा शेतकर्‍यांना वन विभागाकडून भरपाई
डिंभे धरणाच्या घोड शाखेला सोडले आवर्तन; रब्बी गामातील पिकांना होणार लाभ

Latest Marathi News रूईछत्तीशीत सर्कल, भुयारी मार्ग बनवा; ग्रामस्थांकडून मागणीचे निवेदन Brought to You By : Bharat Live News Media.