Crime News : कृषी सेवा केंद्राचे गोदाम फोडले; वीस हजारांची चोरी

राशीन : Bharat Live News Media वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन येथील सावता माळी कृषी सेवा केंद्राचे गोदाम चोरट्यांनी फोडून चोरी केली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. राशीन-भांबोरा मार्गावर रासायनिक खत विक्रेते विशाल राऊत यांचे सावता माळी कृषी सेवा केंद्राते गोदाम आहे. सोमवारी रात्री चोरट्यांनी गोदामासमोरील बाजूचे शेटर तोडून वीस हजार रुपयांची चोरी केली. सकाळी विशाल राऊत गोदाम उघडण्यासाठी गेले असता, त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी सावता माळी नगरमधील एक पिकपही चोरट्यांनी पळविली होती. राशीन येथे वारंवार चोर्या होत असल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. राशीन दूरक्षेत्रातील पोलिसांनी रात्री सावतामाळी नगरपर्यंत गस्त घालावी, अशी मागणी शिवाजी राऊत, युवराज सायकर, कैलास राऊत, नवनाथ राऊत, भगवान शिंदे, रवींद्र शिंदे यांनी केली.
हेही वाचा
Nagar: पोलिस मित्रांची वारी..ठाण्याच्या दारी!
बारामतीतील दहा शेतकर्यांना वन विभागाकडून भरपाई
मुठा घाट अपघातप्रकरणी कारवाई करा; तरुणांचे पौड पोलिसांना निवेदन
Latest Marathi News Crime News : कृषी सेवा केंद्राचे गोदाम फोडले; वीस हजारांची चोरी Brought to You By : Bharat Live News Media.
