
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रुबीना दिलैकने गेल्या महिन्यापूर्वी गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिल्याची माहिती तिची फिटनेस ट्रेनरने दिली होती. यानंतर लगेच काही क्षणात तिने सोशल मीडियावरील ही पोस्ट डिलीट केली होती. या वरून रूबिनाची खरोखरंच प्रसूती झाली की नाही? याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. दरम्यान आता रूबिनाने ही गुडन्यूज खरी असल्याचे सांगत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने जुळ्या मुलांची पहिली झळक दाखवत त्याची नावेही उघड केली आहे. ( Rubina Dilaik Twins )
संबंधित बातम्या
Ananya Panday : ‘खो गए हम कहाँ’ नंतर अनन्याची खास पोस्ट, म्हणाली….
Salman Khan Birthday : सलमाननं प्रेमात धोका मिळाल्याने नव्हे तर ‘या’ कारणाने केलं नाही लग्न
Rubina Dilaik Twins : ३६ व्या वर्षी रुबिना दिलैकच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन; जुळ्या मुलींना दिला जन्म
अभिनेत्री रुबीना दिलैकने पती अभिनव शुक्लासोबत नुकतेच तिच्या इंन्टाग्रामवर अकांऊटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रूबिना आणि अभिनव हातात दोन गोंडस मुली दिसत आहेत. यावरून तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान रूबिनाने मुलांना एक महिना पूर्ण झाल्याने घरात छोटीशा पुजेचे आयोजन केलं आहे. यावेळी तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यावेळी रूबिनाने आकाशी रंगाचा ड्रेस आणि अभिनवने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघांनी लाडक्या मुलींनी कुशीत घेऊन फोटोला पोज दिली आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने, ‘आमच्या मुली, जीवा आणि एधा ( Jeeva and Edhaa ) आज एक महिन्याच्या झाल्या आहेत. हे सांगताना खूपच उत्साह आणि आनंद झाला आहे…. गुरुपूरबच्या शुभ दिवशी आम्हाला खास आशीर्वाद दिला! आमच्या दोन्ही परींसाठी तुमचे आशीर्वाद द्या.’ असे लिहिले आहे. ( Rubina Dilaik Twins )
शेअर केलेल्या पहिल्या फोटोत रूबिना- अभिनवच्या हातात मुली दिसत आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोत दोन्ही लहान मुलींचे गोंडस हात दिसत आहेत. चौथ्या फोटोत मुलींची नाव एधा आणि जीवा असल्याचे सांगितले आहे. तर शेवटच्या फोटोत अभिनव आणि रुबीना पुजा करत असल्याचे पाहायला मिळते. यावरून रकूबिनाने मुलींची नावे एधा आणि जीवा ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, फोटोत तिच्या जुळ्या मुलींचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड कलाकारांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)
View this post on Instagram
A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)
Latest Marathi News रुबीनानं दाखविली जुळ्या मुलींची पहिली झलक; ठेवली ‘ही’ गोड नावं Brought to You By : Bharat Live News Media.
