‘एक्स’ युजरची शेअर्स खरेदीसाठी एक लाखाची मागणी, आनंद महिंद्रा म्हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रख्‍यात उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand mahindra) नेहमी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर लक्षवेधी व्‍हिडिओ शेअर करत असतात. त्‍यांनी शेअर केलेले व्‍हिडिओ नेहमी चर्चेत असतात. तसेच अनेकांना सढळ हाताने मदत करणारे उद्योगपती अशीही त्‍यांची ओळख आहे. यामुळेच एका एक्स X युजरने त्‍यांच्‍याकडे महिंद्रा कंपनीचे शेअर्स खरेदीसाठी एक लाख रुपयांची … The post ‘एक्स’ युजरची शेअर्स खरेदीसाठी एक लाखाची मागणी, आनंद महिंद्रा म्हणाले… appeared first on पुढारी.
‘एक्स’ युजरची शेअर्स खरेदीसाठी एक लाखाची मागणी, आनंद महिंद्रा म्हणाले…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : प्रख्‍यात उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand mahindra) नेहमी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर लक्षवेधी व्‍हिडिओ शेअर करत असतात. त्‍यांनी शेअर केलेले व्‍हिडिओ नेहमी चर्चेत असतात. तसेच अनेकांना सढळ हाताने मदत करणारे उद्योगपती अशीही त्‍यांची ओळख आहे. यामुळेच एका एक्स X युजरने त्‍यांच्‍याकडे महिंद्रा कंपनीचे शेअर्स खरेदीसाठी एक लाख रुपयांची मागणी केली. यावर आनंद महिंद्रांनी तेवढेच समर्पक उत्तर दिले आहे. ( X user asked Anand Mahindra for Rs 1 lakh to buy Mahindra shares )
एक लाख रुपयांची मागणी करणार्‍या युजरला आनंद महिंद्रांनी दिलेल्‍या उत्तरात म्‍हटलं आहे की, “काय आयडिया, सरजी. मी तुमच्या धैर्याची प्रशंसा करतो! विचारण्यात काय नुकसान होते?”

What an idea Sirji.
Aapki himmat ke liye Taaliyaan! Poochne mein kya jaata hai? 😀 https://t.co/respZDQXKl
— anand mahindra (@anandmahindra) December 27, 2023

काही दिवसांपूर्वीच आनंद महिंद्रा यांनी ७०० रुपयांना थार विकत घेणार असल्‍याचे सांगणार्‍या चिमुरड्या चीकू यादवचा व्‍हिडिओ शेअर केला होता. तसेच त्‍याला खुसखुशीत उत्तर म्‍हटलं होतं की, मी इन्स्टा (@cheekuthenoidakid) वर त्याच्या या चिमुरड्याच्‍या काही पोस्ट पाहिल्या. आता मला त्याच्यावर खूप प्रेम आहे. माझी एकच अडचण आहे की जर आम्ही त्याचा दावा प्रमाणित केला आणि 700 रुपयांना थार विकले तर आम्ही लवकरच दिवाळखोर होऊ,”
चिमुरड्याचा व्‍हिडिओ या वर्षी जुलैमधील आहे. चीकूच्या वडिलांनी आपल्‍या इंस्टाग्राम पेजवर तो शेअर केला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या क्लिपला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच चीकूच्‍या निरागस मागणीवरही नेटकर्‍यांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिक्रिया देत त्‍यांचे कौतुकही केले आहे. त्याला थार आणि XUV 700 साठी चाइल्ड ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्याचा विचार करा,” अशी मागणीही एकाने केली आहे.
हेही वाचा : 

Anand Mahindra Christmas Post : छोट्या सांताक्लॉजची टीम सायकलसवारी करत गिफ्ट देण्यासाठी रवाना; आनंद महिंद्रा यांची पोस्ट व्हायरल
कोटातील ‘त्‍या’ घटनांवर आनंद महिंद्रा व्‍यथित; विद्यार्थ्यांना म्‍हणाले, “तुमच्या इतका मी…”
Five States Assembly Election 2023: पाच राज्‍यांमधील निवडणूक निकालांवरील आनंद महिंद्रांचं ट्वीट चर्चेत!

 

Latest Marathi News ‘एक्स’ युजरची शेअर्स खरेदीसाठी एक लाखाची मागणी, आनंद महिंद्रा म्हणाले… Brought to You By : Bharat Live News Media.