शहाद्याच्या साई भक्तांचा येवल्यात अपघात

येवला : Bharat Live News Media वृत्तसेवा- शहाद्याहून शिर्डी कडे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेले शहाद्यातील साई भक्तांची (एर्टीगा MH43 BE 3778) या गाडीची येवला मनमाड रस्त्यावरील कासारखेडे शिवारात येवल्याहून मनमाड कडे येणाऱ्या मॅजिक (MH 41 E 3465) बरोबर समोरासमोर धडक झाली. बुधवारी दुपारी बारा वाजता झालेल्या या अपघातामध्ये दोन बालकांसह सहा जण गंभीर जखमी झाले. यात ईरटीगा गाडीतून शहाद्याची बोरसे कुटुंबीय प्रवास करीत होती
यातील काही जखमींना मनमाड व नाशिक येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच येवल्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. खाजगी रुग्णवाहिकतून जखमींना येवल्याच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांची उपलब्धता कमी असल्याने येवला सोशल मीडिया फोरमचे किरण सिंग परदेशी यांनी सोशल मीडियातून आव्हान केल्यावर फोरमचे सदस्य बालरोग तज्ञ डॉक्टर खांगटे पॅथॉलॉजिस्ट भूषण शिनकर, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, अतुल घटे यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठले. सोशल मीडिया फोरमच्या कार्यकर्त्यांसह नगरसेवक सचिन शिंदे यांच्या मित्र मंडळांनी ही जखमींसाठी चहा बिस्किटे व मदतीसाठी धाव घेतली.
अपघात ग्रस्तांची नावे
मनोहर हिरालाल माळी वय 30
रोहिदास हिरालाल बोरसे वय 32
हरी शिवा माळी वय 28
जयश्री मनोहर माळी वय 28
परमिला हिरालाल माळी वय 50
रूपाली रोहिदास बोरसे वय 30
भार्गवी रोहिदास बोरसे वय 8
शिव रोहिदास बोरसे
कृष्णा मनोहर माळी
Latest Marathi News शहाद्याच्या साई भक्तांचा येवल्यात अपघात Brought to You By : Bharat Live News Media.
