तमाशा बघण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा खून

जळगांव- पाचोरा तालुक्यातील बदरखे या ठिकाणी जत्रेत तमाशा बघण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मनोज निकम यांच्या पोटावर, पाठीवर व खांद्यावर वार करून त्यांना ठार मारण्यात आले. पाचोरा पोलिसांत अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी नगर येथील सोयगाव तालुक्यातील हनुमंत खेडा येथे राहणारे चुलत भाऊ मनोज निकम व नंदकिशोर पाटील हे पाचोरा तालुक्यातील बदरखे या ठिकाणी जत्रा व त्या ठिकाणी असलेल्या तमाशा बघण्यासाठी (दि. 25) गेले होते. साडेसात वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मनोज निकम यास पोटावर., पाठीवर व खांद्यावर वार करुन ठार मारले. या प्रकरणी नंदकिशोर शिवदास पाटील यांनी पाचोरा पोलीसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहे.
हेही वाचा :
Pune News : लाल कांद्यांची उपबाजारात मोठी आवक; मात्र दर घसरलेलेच
अजित दादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही : खा. अमोल कोल्हे
Latest Marathi News तमाशा बघण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा खून Brought to You By : Bharat Live News Media.
