सोन्याचा दर सर्वकालीन उच्चांकाजवळ, आज किती महागले?

पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात वाढ सुरुच आहे. आज बुधवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,१८७ रुपयांवर खुला झाला. काल मंगळवारी हा दर ६३,०५७ रुपये होता. आज सोन्याच्या दरात १३० रुपयांची वाढ झाली. सध्याचा दर हा सोन्याच्या सर्वकालीन उच्चांकाच्याजवळ पोहोचला आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,२८१ रुपयांवर पोहोचला होता. … The post सोन्याचा दर सर्वकालीन उच्चांकाजवळ, आज किती महागले? appeared first on पुढारी.

सोन्याचा दर सर्वकालीन उच्चांकाजवळ, आज किती महागले?

Bharat Live News Media ऑनलाईन : सोन्याच्या दरात वाढ सुरुच आहे. आज बुधवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,१८७ रुपयांवर खुला झाला. काल मंगळवारी हा दर ६३,०५७ रुपये होता. आज सोन्याच्या दरात १३० रुपयांची वाढ झाली. सध्याचा दर हा सोन्याच्या सर्वकालीन उच्चांकाच्याजवळ पोहोचला आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,२८१ रुपयांवर पोहोचला होता. (Gold Price Today)
संबंधित बातम्या 

शेअर बाजारात तेजीचा चौकार, सेन्सेक्स ७१,७०० वर, निफ्टी २१,५०० पार
सोन्याच्या दरात मोठी तेजी, दर ६३ हजार पार, चांदी स्वस्त
नुकसान टाळा, वर्षअखेरीपूर्वी ‘हे’ कराच!

दरम्यान, सोने महागले असले तरी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो ७४,३५७ रुपयांवर खुला झाला आहे. काल चांदीचा दर प्रति किलो ७४,७५० रुपयांवर बंद झाला होता. चांदीचा सध्याचा दर सर्वकालीन उच्चांकापेक्षा २,५७७ रुपयांनी कमी आहे. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी चांदीने ७६,९३४ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज बुधवारी २४ कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,१८७ रुपये, २२ कॅरेट ५७,८७९ रुपये, १८ कॅरेट ४७,३९० रुपये, १४ कॅरेट ३६,९६४ रुपयांवर खुला झाला. तर चांदी दर प्रति किलो ७४,३५७ रुपयांवर व्यवहार करत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किचिंत घसरण दिसून येत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव १.२१ डॉलरच्या घसरणीसह प्रति औंस २,०६४.९९ डॉलर दराने व्यवहार करत आहे. तर चांदी ०.०२ डॉलरच्या घसरणीसह प्रति औंस २४.१६ डॉलर पातळीवर व्यवहार करत आहे. (Gold Price Today)
शुद्ध सोने असे ओळखा?
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

#Gold and #Silver Opening #Rates for 27/12/2023
For more details contact:
Saurabh +91 9004120120 / 022- 49098950 / 022- 49098960
Follow Us On :
Twitter https : https://t.co/ZcOoV7Rtpn
Instagram https : https://t.co/3Y7EDUbUzS
Threads : https://t.co/4ikgiV1SxS
Facebook Page… pic.twitter.com/CEtQ2I4V3p
— IBJA (@IBJA1919) December 27, 2023

Latest Marathi News सोन्याचा दर सर्वकालीन उच्चांकाजवळ, आज किती महागले? Brought to You By : Bharat Live News Media.