अजित पवार यांच्याकडून मांजरी उड्डाणपुलाची पाहणी

मांजरी : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणीपुरवठा योजना, रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, मुळा मुठा नदीवरील पुलांच्या विविध विकासकामांची पाहणी केली. या वेळी आमदार चेतन तुपे, पुणे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, बाप्पा … The post अजित पवार यांच्याकडून मांजरी उड्डाणपुलाची पाहणी appeared first on पुढारी.

अजित पवार यांच्याकडून मांजरी उड्डाणपुलाची पाहणी

मांजरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणीपुरवठा योजना, रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, मुळा मुठा नदीवरील पुलांच्या विविध विकासकामांची पाहणी केली. या वेळी आमदार चेतन तुपे, पुणे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, बाप्पा बहीर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, वैशाली आवटे, डॉ. भगवान पवार, सुरेश घुले, दिलीप घुले, डॉ. शंतनू जगदाळे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, मांजरी नळ पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करावी. हडपसर-मांजरी रस्त्यावरील मांजरी बु. येथे रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी दोन्ही बाजूंस लागणा-या जमिनीचे संपादन करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकार्‍याकडे सादर करावा. मांजरी बु. आणि मांजरी खु. यांना जोडण्यासाठी मुळा-मुठा नदीवर दोनपदरी पुलाचे काम सुरू आहे, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा

जल, जंगल, जमिनीची पुरेवाट: जांभूळवाडी तलाव जलपर्णीने व्यापला
अजित दादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही : खा. अमोल कोल्हे
बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षा, आता 10 जानेवारीला होणार

 
Latest Marathi News अजित पवार यांच्याकडून मांजरी उड्डाणपुलाची पाहणी Brought to You By : Bharat Live News Media.