वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहचेल : राज्यपाल रमेश बैस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे बालेवाडी येथे 50 व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा … The post वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहचेल : राज्यपाल रमेश बैस appeared first on पुढारी.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहचेल : राज्यपाल रमेश बैस

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे बालेवाडी येथे 50 व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहचेल, असा विश्वास बैस यांनी या वेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, विद्या प्राधिकरणाचे संचालक अमोल येडगे उपस्थित होते. बैस म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बालवैज्ञानिकांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचे आयोजन व्हावे.
बालवैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातून भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील, त्यांच्या वैज्ञानिक आविष्कारातून नव्या पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बालवैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतील. पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नावीन्यता आणि नवकल्पनांना महत्त्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल, यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
केसरकर म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणानुसार हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल. प्रदर्शन 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे. येडगे यांनी प्रास्ताविकात बालविज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली.
हेही वाचा

बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षा, आता 10 जानेवारीला होणार
पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा बंद; महापालिकेचा कारवाईचा इशारा
क्षेत्र नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्याची सांगता

Latest Marathi News वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहचेल : राज्यपाल रमेश बैस Brought to You By : Bharat Live News Media.