धक्कादायक ! भररस्त्यात पेटवून घेतले; पोलिस मदतीसाठी धावले, पण..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून एकाने पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना येरवड्यातील लूप रोड परिसरात सोमवारी घडली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गोल्फ क्लब रस्त्याने जाणार होता. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तावरील पोलिसांनी पेटवून घेणार्‍या व्यक्तीला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम … The post धक्कादायक ! भररस्त्यात पेटवून घेतले; पोलिस मदतीसाठी धावले, पण.. appeared first on पुढारी.

धक्कादायक ! भररस्त्यात पेटवून घेतले; पोलिस मदतीसाठी धावले, पण..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून एकाने पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना येरवड्यातील लूप रोड परिसरात सोमवारी घडली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गोल्फ क्लब रस्त्याने जाणार होता. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बंदोबस्तावरील पोलिसांनी पेटवून घेणार्‍या व्यक्तीला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले. बबलू माणिक गायकवाड (वय 40, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
येरवड्यातील लूप रोड परिसरात पीएमपी बसथांब्याजवळ एका व्यक्तीने पेटवून घेतल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला सोमवारी दुपारी मिळाली. त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा तेथून जाणार होता. त्यामुळे येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरित गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्युू झाला. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून गायकवाड यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
हेही वाचा

चिंताजनक ! शहराची हवा पुन्हा धोक्याच्या पातळीवर
1950 नंतर प्रथमच खालावले ब्रिटीश नागरिकांचे राहणीमान!
विमानातून उडी, तीही पॅराशूटशिवाय!

Latest Marathi News धक्कादायक ! भररस्त्यात पेटवून घेतले; पोलिस मदतीसाठी धावले, पण.. Brought to You By : Bharat Live News Media.