कानातून धूर काढणारा तिखट हलवा!

जयपूर : हलवा हा शब्द जरी उच्चारला तरी त्याची सुमधून चव जिभेवर रेंगाळण्यास सुरुवात होण्यास अजिबात वेळ लागत नाही. म्हटले की, डोळ्यासमोर येते गाजर हलवा, दुधी हलवा आणि मूग डाळीचा हलवा. हे तीनही पदार्थ अत्यंत गोड आणि स्वादिष्ट असतात. थंडीत तर गरमागरम हलवा खाणं म्हणजे सोने पे सुहागा! पण एक हलवा असाही आहे जो चक्क … The post कानातून धूर काढणारा तिखट हलवा! appeared first on पुढारी.

कानातून धूर काढणारा तिखट हलवा!

जयपूर : हलवा हा शब्द जरी उच्चारला तरी त्याची सुमधून चव जिभेवर रेंगाळण्यास सुरुवात होण्यास अजिबात वेळ लागत नाही. म्हटले की, डोळ्यासमोर येते गाजर हलवा, दुधी हलवा आणि मूग डाळीचा हलवा. हे तीनही पदार्थ अत्यंत गोड आणि स्वादिष्ट असतात. थंडीत तर गरमागरम हलवा खाणं म्हणजे सोने पे सुहागा! पण एक हलवा असाही आहे जो चक्क तिखट आहे आणि तो खाल्ल्याने अगदी कानातून धूर निघणेच बाकी राहते! .
उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये मिठाईचे एक लोकप्रिय दुकान आहे. तिथे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 20 प्रकारचे हलवे मिळतात; पण गोड नाही तर त्यांची चव असते तिखट. हलव्याचं नाव ऐकताच आपल्या तोंडात पाणी येते. आपण रव्याचा हलवाही आवडीने खातो. परंतु, या दुकानात चक्क मिरचीचा हलवा मिळतो.
इथल्या प्रत्येक हलव्यात खवा आणि मिरची असते. इथला हलवा खाऊन अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. परंतु, तरीही 300 रुपये किलोचा हिरव्या मिरचीचा हलवा अनेकजण आवडीने खरेदी करतात. इतकेच नाही, तर इथे ड्रायफू्रटचा हलवा 6000 रुपयांनाही मिळतो. या दुकानात केवळ मिरचीचाच हलवा मिळत नाही तर गाजर, अक्रोड, चॉकलेट, मूगडाळ, संत्री, ब्ल्यू बेरी, नारळ, बदाम, पिस्ता, गुलाब, मेवा इत्यादी विविध प्रकारचे हलवे मिळतात. ते तिखट असले तरीही त्यांची किंमत 500 रुपयांपेक्षाही जास्त असते.
इथे येणारे ग्राहक या हलव्यांच्या चवीबाबत आश्चर्य व्यक्त करतात. ते म्हणतात, आधी कधीच असा हलवा खाल्ला नाही.
मुळात तिखट हलवा ही संकल्पनाच फार वेगळी आहे. या दुकानाचं नाव आहे छप्पन भोग. इथले मार्केटिंग हेड क्षितिज सांगतात की, थंडीत इथल्या हलव्यांना प्रचंड मागणी असते. या हलव्यांची चव तिखट असली, तरी त्यामुळे पोटाचा कोणताही विकार होत नाही, असाही त्यांचा दावा आहे.
Latest Marathi News कानातून धूर काढणारा तिखट हलवा! Brought to You By : Bharat Live News Media.