Australia vs Pakistan : ऑस्ट्रेलियाने पाकला दमवले

मेलबर्न, वृत्तसंस्था : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरुद्ध (Australia vs Pakistan) खेळल्या जात असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 187 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लॅबुशेन (44 धावा) आणि ट्रॅॅव्हिस हेड (9 धावा) नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 66 षटकांचा खेळ होऊ शकला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने … The post Australia vs Pakistan : ऑस्ट्रेलियाने पाकला दमवले appeared first on पुढारी.

Australia vs Pakistan : ऑस्ट्रेलियाने पाकला दमवले

मेलबर्न, वृत्तसंस्था : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरुद्ध (Australia vs Pakistan) खेळल्या जात असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 187 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लॅबुशेन (44 धावा) आणि ट्रॅॅव्हिस हेड (9 धावा) नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 66 षटकांचा खेळ होऊ शकला.
पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या यजमान ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी 163 चेंडूंचा सामना करत 90 धावांची भागीदारी केली. आगा सलमानने डेव्हिड वॉर्नरला (38) बाबर आझमकडे झेलबाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. विकेट पडताच पहिल्या दिवसाचे पहिले सत्र संपले.
दुसर्‍या सत्रातील काही षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली. उस्मान ख्वाजा 101 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 42 धावा करून माघारी परतला. यावेळी कांगारूंची धावसंख्या 108 होती. या सत्रात पावसामुळे जास्त षटके खेळता आली नाहीत आणि 42.4 षटकांत 2 बाद 114 धावांवर चहापानाची वेळ घोषित करण्यात आली.
चहापानानंतर खेळ सुरू झाला तेव्हा मार्नस लॅबुशेन आणि स्टिव्ह स्मिथ या जोडीने धावसंख्या 150 च्या पुढे नेली. या दोन फलंदाजांमध्ये तिसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. स्मिथ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता; पण 58 व्या षटकात आमीर जमालने त्याची विकेट घेतली. स्मिथ 75 चेंडूंत 26 धावा करून यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानकडे झेलबाद झाला. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 187 धावा केल्या. पाकिस्तानकडून आगा सलमान, हसन अली आणि आमीर जमाल यांना प्रत्येकी एक बळी मिळवण्यात यश आले.
वॉर्नरचा विक्रम
वॉर्नरने सामन्याच्या पहिल्या दिवशी 20 धावा करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे. त्याने याबाबतीत स्टिव्ह वॉला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंग (27,368) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर वॉर्नर (18,515), स्टिव्ह वॉ (18,496), लन बॉर्डर (17,698) आणि मायकल क्लार्क (17,112) यांचा क्रमांक लागतो.
The post Australia vs Pakistan : ऑस्ट्रेलियाने पाकला दमवले appeared first on Bharat Live News Media.