शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हालाही हव्यात : भुजबळ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीत सुंदोपसुंदी सुरू असताना, आता महायुतीतही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीत शिंदे गटाचे जेवढे आमदार आले, तितकेच आमचेही आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील, तेवढ्याच अजित पवार गटाला मिळायला हव्यात, असा दावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री … The post शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हालाही हव्यात : भुजबळ  appeared first on पुढारी.

शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हालाही हव्यात : भुजबळ 

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीत सुंदोपसुंदी सुरू असताना, आता महायुतीतही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीत शिंदे गटाचे जेवढे आमदार आले, तितकेच आमचेही आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील, तेवढ्याच अजित पवार गटाला मिळायला हव्यात, असा दावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत मंत्री भुजबळ यांनी नाशिकमधील माध्यमांशी संवाद साधला. महायुतीतल्या जागा वाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी भूमिका मांडली, ती योग्यच असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे. निवडणुका आल्या की, आव्हान आणि प्रतिआव्हान दिले जाते असे सांगत, अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले. नाशिकमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावाही भुजबळांनी केला आहे. काही जण काळे झेंडे दाखवत आहेत त्यांना दाखवू देत, असे सांगत येवल्यात काळे झेंडे दाखवण्याचा प्रकरणावर भुजबळ यांनी टीका केली. येत्या २३ जानेवारीला नाशिकमध्ये होत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाअधिवेशनावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. मंत्रिमंडळात भुजबळ यांचे ऐकले जात नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता भुजबळांनी, मी एकटा पडलो नसून माझ्यामागे असंख्य नागरिक असल्याचे सांगितले. राज्यातील काही आमदारसुद्धा आपल्यासोबत आहेत. परंतु ते सध्या बोलत नाहीत, असे सांगत मला एकट्याला लढाईची सवय असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
महाजनांचा सबुरीचा सल्ला मान्य
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील आणि ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. जरांगे-पाटील आणि भुजबळ यांना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. भुजबळांनीही तो मान्य करत जरांगे-पाटील यांच्यावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. जरांगे-पाटील यांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत आमचे जे मंत्री त्यांच्याशी चर्चा करत आहेत, ते यावर बोलतील, असे सांगत त्यांनी या विषयावर चु्प्पी साधली.
हेही वाचा :

तडका : थांबवा रे यांना कुणीतरी
पाकच्या निवडणुकीत प्रथमच हिंदू महिला उमेदवार
अजित पवार- शिंदे गटात रस्सीखेच; लोकसभेच्या जागावाटपावरून दोन्ही गट आक्रमक

Latest Marathi News शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हालाही हव्यात : भुजबळ  Brought to You By : Bharat Live News Media.