Weather Update : राज्यात चार दिवस हलक्या सरींचा अंदाज
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नव्या वर्षाचे स्वागत हलक्या पावसाने होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे थंडी अन् पाऊस असे चित्र जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात राहू शकते. 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत राज्यात हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही वार्याची गती वाढली आहे. त्यामुळे राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागल्याने 30 डिसेंबर ते 2 जानेवारी असे चार दिवस हलका ते मध्यम पाऊस राज्याच्या विविध भागात होऊ शकतो.
मंगळवारचे राज्याचे तापमान..
नगर 10.3, जळगाव 11.9, पुणे 12.3, कोल्हापूर 17.1, महाबळेश्वर 16.2, मालेगाव
13.6, नाशिक 12.6, सांगली 15.2, सातारा 14.2, धाराशिव 14, छत्रपती संभाजीनगर 12.6, परभणी 13.2, नांदेड 14.2, बीड 13.5, अकोला 14.1, अमरावती 14.3, चंद्रपूर 12, गोंदिया 11.4, नागपूर 14.2, वर्धा 14, यवतमाळ 12.5.
पुणे, नगर, जळगाव गारठले
मंगळवारी राज्यातील नगर, जळगाव व पुणे या शहरांचा पारा सर्वात कमी होता. नगर 10.3, जळगाव 11.9, तर पुणे 12.3 अंशावर होते. तसेच मराठवाडा व विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान 12 ते 13 अंशावर होते. महाबळेश्वरचे किमान तापमान ढगाळ वातावरणामुळे 16 अंशावर गेले होते.
हेही वाचा
रंजन गोगोई कॉंग्रेसवर संतप्त
परभणी : श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दत्त जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात
श्री दत्तप्रभूंच्या जयघोषात दुमदुमली पंचाळेश्वर नगरी
Latest Marathi News Weather Update : राज्यात चार दिवस हलक्या सरींचा अंदाज Brought to You By : Bharat Live News Media.