सुनिल केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सरकारचा विरोध : नितीन तेलगोटे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांच्या जामीन प्रकरणात दोन्ही पक्षाकडून आज (दि.२६) युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवाद संपलेला आहे. उद्या किंवा परवा निकाल येऊ शकतो. मात्र, सरकारी पक्षातर्फे शिक्षेला स्थगितीस तीव्र विरोध करण्यात आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकिल नितीन तेलगोटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  Sunil Kedar तेलगोटे म्हणाले की, सरकारी पक्षातर्फे असा … The post सुनिल केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सरकारचा विरोध : नितीन तेलगोटे appeared first on पुढारी.

सुनिल केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सरकारचा विरोध : नितीन तेलगोटे

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांच्या जामीन प्रकरणात दोन्ही पक्षाकडून आज (दि.२६) युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवाद संपलेला आहे. उद्या किंवा परवा निकाल येऊ शकतो. मात्र, सरकारी पक्षातर्फे शिक्षेला स्थगितीस तीव्र विरोध करण्यात आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकिल नितीन तेलगोटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  Sunil Kedar
तेलगोटे म्हणाले की, सरकारी पक्षातर्फे असा युक्तिवाद मांडण्यात आला की, सर्वोच्च न्यायालयाने काही न्यायनिवाडा देताना शिक्षेला स्थगिती देण्याचा अधिकार हा फक्त हायकोर्टाला असल्याचे नमूद केले आहे. बचाव पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख करत खालच्या न्यायालयाला सुद्धा अधिकार असल्याचे सुनील केदार यांच्या वकिलांनी मांडले. काँग्रेस नेते राहुल गांधी, नवज्योतसिंग सिद्धू या केसेसचा उल्लेख बचाव पक्षाकडून करण्यात आला. Sunil Kedar
दरम्यान, खालच्या न्यायालयाचा निर्णय किती इनप्रॉपर आहे, हे बचाव पक्षाला सिद्ध करायचे असते. मात्र, या केसमध्ये डॉक्युमेंटरी पुरावे भक्कम असल्यामुळेच खालच्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे याला स्थगिती देण्याचा अधिकार या न्यायालयाला नसल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले. केदार यांच्या वकिलांकडून एकाच केसमध्ये शिक्षेला स्थगिती आणि जामिनाची मागणी करण्यात आली आहे. इतर पाच आरोपींनी फक्त जामीन मिळावा, यासाठी मागणी केली. दंडाला सुद्धा स्थगिती मिळावी, अशीही मागणी केली आहे. आतापर्यंत केदार यांनीच दंड भरला, असेही नितीन तेलगोटे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा 

Sunil Kedar : माजी आमदार सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर बुधवारी निर्णय
Sunil Kedar : कारागृहात रवानगी होताच सुनील केदारांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल
Sunil Kedar : काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांचा तुरुंगवास, दंडही

Latest Marathi News सुनिल केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सरकारचा विरोध : नितीन तेलगोटे Brought to You By : Bharat Live News Media.