Nagar : पढेगावात जुगार खेळणार्‍यांचा पोलिसावर हल्ला

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील पढेगाव येथील बाजारात सोरट खेळत असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आठ ते दहा जणांनी हल्ला चढवला आणि मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र खळेकर पढेगाव बीटवर काम असतात. ते संध्याकाळच्या सुमारास बाजारात गस्त घालण्यासाठी होमगार्ड सुनील देवकर व किशोर … The post Nagar : पढेगावात जुगार खेळणार्‍यांचा पोलिसावर हल्ला appeared first on पुढारी.

Nagar : पढेगावात जुगार खेळणार्‍यांचा पोलिसावर हल्ला

श्रीरामपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  तालुक्यातील पढेगाव येथील बाजारात सोरट खेळत असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आठ ते दहा जणांनी हल्ला चढवला आणि मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र खळेकर पढेगाव बीटवर काम असतात. ते संध्याकाळच्या सुमारास बाजारात गस्त घालण्यासाठी होमगार्ड सुनील देवकर व किशोर बत यांच्यासमवेत गेले. त्या वेळी मराठी शाळेच्या भिंतीलगत रात्री 8.30 सुमारास पथदिव्याच्या स्ट्रिट लाईटच्या उजेडात काही जण जुगार खेळताना दिसले.
गस्त घालणारे पोलिस, होमगार्ड तेथे गेले तेव्हा त्यांना पाहून जुगार खेळणारे पळून जाऊ लागले. त्यापैकी दोघांना पोलिसांनी पकडले असता त्यांनी त्यांची नावे किशोर रंगनाथ मांजरे, दीपक सावंत बर्डे अशी सांगितली. मात्र या दोघांनी पोलिस व होमगार्डशी हुज्जत घालून आरडाओरडा केला. त्या वेळी नऊ ते दहा जण त्यांच्या दिशेने पळत आले. आणि खळेकर व देवकर यांच्यावर हल्ला केला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे होमगार्ड घाबरून पळून गेले. त्या वेळी एकाने खळेकर यांचा मोबाईलही काढून घेतला. खळेकर जखमी झालेले पाहून हल्लेखोर पळून गेले. त्यांना कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबासाहेब रंगनाथ मांजरे, सौर अण्णासाहेब गायकवाड, सौर गायकवाड, अरुण पोपट खैरनार, सुनील बाजीराव तोरणे, भाऊसाहेब बारकू गायकवाड, सुभान बाबामिया शेख, पिंट्या खैरनार, महेश बाबासाहेब मांजरे, यांच्यासह अनोळखी लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latest Marathi News Nagar : पढेगावात जुगार खेळणार्‍यांचा पोलिसावर हल्ला Brought to You By : Bharat Live News Media.