१०० टक्के खात्री वर्ल्ड कप आमचाच; रजनीकांत यांची भविष्यवाणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ ( ICC cricket world cup 2023 ) क्रिकेटचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुपारी २ वाजता खेळण्यात येणार आहे. यामुळे क्रिकेटचे चाहते १९ नोव्हेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान सुपरस्टार रजनीकांत यांनी वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्यातील विजेते पदाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
संबंधित बातम्या
Sunny Leone : मला असे काहीतरी करावे लागले, जे मी आधी कधीच केले नव्हते
Marathi TV Serials : सारं काही तिच्यासाठी, तुला शिकवीन…मालिकांचा महासंगम
कॅटरिनाच्या ‘Merry Christmas’ ची दुसऱ्यांदा बदलली रिलीज डेट; ‘या’ दिवशी येणार भेटीला
यापूर्वीचा उपांत्य फेरीचा क्रिकेट सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारताने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना पाहण्यासाठी असंख्य क्रिकेट चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनीही स्टेडियमवर हजेरी लावली होती. यात सुपरस्टार रजनीकांतसोबत बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री कियारा अडवाणी, शाहिद कपूर, रणबीर कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी स्टेडियममध्ये पोहोचून टीम इंडियाला प्रोत्साहन दिलं होतं. आता रजनीकांत यांनी अंतिम सामन्यातील विजेते पदाबाबत भविष्यवाणी केली आहे.
यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘ उपांत्य फेरीचा सामना पाहताना सुरुवातीला मला अस्वस्थ वाटले, कारण भारतीय टीम जिंकते की नाही? यांची मनात भिती होती. नंतर पुढे एक-एक करून विकेट पडत गेल्या आणि सगळं सुरळीत झालं. सामन्यावेळी पहिल्या दीड तासात खूपच दडपण आलं होतं. यामुळे मी खूप घाबरलो होतो. मात्र, शेवटी न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत भारताने अंतिम फेरी गाठली. आता मला खात्री आहे की, १०० टक्के वर्ल्ड कप आमचाच आहे. आम्हीच जिंकणार आहोत.’ ( ICC cricket world cup 2023 )
रजनीकांत यांच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचे झाल्यास, शेवटचे ते दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमारच्या ‘जेलर’ या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट २०२३ च्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित आगामी ‘थलावर १७०’ चित्रपटाचे एक शेड्यूल त्यांनी पूर्ण केलं आहे.
VIDEO | “At first, I felt nervous. Later, when wickets kept falling, it went well. During that one and a half hours, I was quite nervous. But I am 100% sure the (World) Cup is ours,” says actor Rajinikanth as he arrives in Chennai from Mumbai after watching the India vs New… pic.twitter.com/NU8a4x1MPO
— Press Trust of India (@PTI_News) November 16, 2023
The post १०० टक्के खात्री वर्ल्ड कप आमचाच; रजनीकांत यांची भविष्यवाणी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ ( ICC cricket world cup 2023 ) क्रिकेटचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुपारी २ वाजता खेळण्यात येणार आहे. यामुळे क्रिकेटचे चाहते १९ नोव्हेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान सुपरस्टार रजनीकांत …
The post १०० टक्के खात्री वर्ल्ड कप आमचाच; रजनीकांत यांची भविष्यवाणी appeared first on पुढारी.