बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर जखमी

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे शिवारात कोंबरवाडी येथे ऊस तोडणी कामगारावर बिबट्याने हल्ला केला. त्या हल्ल्याला प्रतिकार करताना २८ वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी सात वाजता घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, कोंबरवाडी बेल्हे (ता. जुन्नर) येथील शेतकरी शिवाजी तुकाराम गुंजाळ यांच्या शेतातील ऊस तोडण्यासाठी … The post बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर जखमी appeared first on पुढारी.

बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर जखमी

बेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे शिवारात कोंबरवाडी येथे ऊस तोडणी कामगारावर बिबट्याने हल्ला केला. त्या हल्ल्याला प्रतिकार करताना २८ वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी सात वाजता घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, कोंबरवाडी बेल्हे (ता. जुन्नर) येथील शेतकरी शिवाजी तुकाराम गुंजाळ यांच्या शेतातील ऊस तोडण्यासाठी ऊस मजूर सकाळी आले होते. त्यांनी ऊस तोडण्यास सुरुवात केली असता उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने ऊस तोडणी मजूर सुरेश नामदेव माळी (वय २८, रा. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला पंजा मारुन हाताला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी जखमी माळी यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती वनपाल नीलम दुबे यांनी दिली. या भागात ऊस तोडणी सुरू असल्याने बिबटे सैरभैर झाल्याचे या घटनेवरून दिसून येते. या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून यापूर्वी अनेक पाळीव प्राणी व पशुधन बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा :

Bhandara News: विमा कंपनीकडून भरपाई नाही, संतापलेल्या शेतकऱ्यांनी उभे पिक पेटविले
Pune : पानशेतच्या खानापूर पुलाचे काम अर्धवटच

Latest Marathi News बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.