नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा रावेर शहरात तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये २३ ग्रॅम सोने, चाळीस भार चांदी तर ७२ हजार रोख वेग-वेगळ्या घटनांमधुन चोरीला गेले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले असून, यामुळे रावेर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, प्रभारी अधिकारी सतीष … The post नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास appeared first on पुढारी.

नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास

जळगाव ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा रावेर शहरात तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये २३ ग्रॅम सोने, चाळीस भार चांदी तर ७२ हजार रोख वेग-वेगळ्या घटनांमधुन चोरीला गेले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले असून, यामुळे रावेर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, प्रभारी अधिकारी सतीष अडसूर यांनी घरफोडी केलेल्या ठिकाणची पाहणी केली.
या घटनेबाबत अधिक वृत्त असे की, रावेर शहरात वेग-वेगळ्या भागात घरफोड्या झाल्या आहेत. तर काही ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला आहे. या सर्व घटना रावेर शहरात रात्री लाईट नसताना झाल्या आहेत. सौभाग्य नगर येथील रहीवासी असलेले प्रशांत पाटील कामा निमित्त नाशिकला गेले असता. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरात असलेल्या कपाटातून २१ ग्रॅम सोन्याचे दागीने, १७ भार चांदी तसेच २७ हजार रोख चोरीला गेले.
तर दूसरी चोरीची घटना देखिल सौभाग्य नगर मध्येच झाली आहे. येथील अशोक प्रेमसिंग पाटील हे त्यांच्या मूळ गावी पाचोरा येथे गेले असतांना त्यांच्या घराचा देखिल कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ४५ हजार रोख चोरून नेले आहेत. घरमालक प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिसरी घटना जिआय कॉलनी येथे घडली. श्रीमती अटकाळे यांचे देखिल बंद घर फोडण्यात आले आहे. त्या बाहेरगावी असल्याने त्यांच्याकडील किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप कळलेले नाही. या घडलेल्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
धान्य दुकानातून बारा हजाराचे धान्य लंपास

दरम्यान तिस-या घटनेत रावेर शहरातील स्वस्त धान्य दुकाध फोडून अज्ञात चोरट्यांनी बारा हजार रुपये किंमतीचे गहू आणि तांदळाचे कट्टे चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले आहे. रावेर येथील स्टेशन रस्त्यावरील लागुन असलेल्या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाच्या दरवाजाची कडी कोंडा रविवारी रात्री चोरट्यांनी तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील पाच हजार रुपये किंमतीचे पाच गव्हाचे कट्टे ( पोते), सात हजार दोनशे रुपये किंमतीचे सहा तांदळाचे कट्टे चोरुन नेले‌. या प्रकरणी सतिश धनराज पवार आणि गोपाल उर्फ कृष्णा महाजन पवार भोर स्टेशन यांना दोघांना अटक केली आहे. याबाबत लक्ष्मण निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Latest Marathi News नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास Brought to You By : Bharat Live News Media.