विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही : ‘मनसे’चा सरकारवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मनसेने आज (दि.२५) एक व्हिडिओ त्यांच्या ‘X’ अकाऊंटवरून शेअर केला आहे. या सोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये मनसेने राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. (MNS Vs BJP) MNS Vs BJP: हिंदुस्थानचं राजकारण कधीच सूडबुद्धीने पेटलं नव्हतं- मनसे अटलबिहारी वाजपेयी यांचा संसद … The post विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही : ‘मनसे’चा सरकारवर निशाणा appeared first on पुढारी.
विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही : ‘मनसे’चा सरकारवर निशाणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मनसेने आज (दि.२५) एक व्हिडिओ त्यांच्या ‘X’ अकाऊंटवरून शेअर केला आहे. या सोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये मनसेने राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. (MNS Vs BJP)
MNS Vs BJP: हिंदुस्थानचं राजकारण कधीच सूडबुद्धीने पेटलं नव्हतं- मनसे
अटलबिहारी वाजपेयी यांचा संसद सभागृहातील बोलतानाचा व्हिडिओ आणि संदेश मनसेने शेअर करत, सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे. मनसेने म्हटले आहे की, सत्ताधीश कुणीही असो; पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. पण “हि #अटलवाणी ऐकलीत तर कळेल कि, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण आज……………” असे  ट्विट मनसेने केले आहे. (MNS Vs BJP)
पुन्हा ह्या देशात लोकशाही बळकट होवो
राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना की, पुन्हा ह्या देशात विचारांचं, विवेकाचं, तात्विक विरोधाचं राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो, अशी प्रार्थना मनसेने आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केली आहे. (MNS Vs BJP)

सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही… पण हि #अटलवाणी ऐकलीत तर कळेल कि, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण आज……………
असो.
राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न… pic.twitter.com/4lWfmriv7v
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 25, 2023

हेही वाचा:

अजित पवार यांच्या टीकेला शरद पवार यांचं प्रत्युत्तर, ‘माझे बंड नव्हतेच…’
Ashish Shelar on Uddhav Thackeray | ” भोंदूगिरी सोडा, श्रीराम म्हणा…”; भाजपच्या आशिष शेलारांचे ट्विट चर्चेत
मध्‍य प्रदेश मंत्रिमडळाचा विस्‍तार, २८ जणांनी घेतली शपथ

Latest Marathi News विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही : ‘मनसे’चा सरकारवर निशाणा Brought to You By : Bharat Live News Media.