दिल्ली विमानतळावर दाट धुक्यांमुळे विमान उड्डाणे प्रभावित

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुक्यांमुळे उड्डाणे प्रभावित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळाकडून सोमवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी आपल्या उड्डाणाच्या ताज्या माहितीसाठी संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधावा, असेही यात सांगितले गेले आहे. तसेच विमानतळ प्राधिकरणाने धुके विरोधी लँडिंग यंत्रणा सुरू केली आहे. त्याचप्रमाणे हैदराबादमधील राजीव … The post दिल्ली विमानतळावर दाट धुक्यांमुळे विमान उड्डाणे प्रभावित appeared first on पुढारी.

दिल्ली विमानतळावर दाट धुक्यांमुळे विमान उड्डाणे प्रभावित

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुक्यांमुळे उड्डाणे प्रभावित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळाकडून सोमवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी आपल्या उड्डाणाच्या ताज्या माहितीसाठी संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधावा, असेही यात सांगितले गेले आहे. तसेच विमानतळ प्राधिकरणाने धुके विरोधी लँडिंग यंत्रणा सुरू केली आहे. त्याचप्रमाणे हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवाही दाट धुक्यामुळे प्रभावित झाली. Delhi Fog

उत्तर भारतात थंडीचा जोर वाढू लागला आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत दाट धुक्यासह तापमान ९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारी सकाळी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या अनेक भागांमध्ये दृश्यमानता १२५ मीटरपर्यंत कमी झाली. रविवारी किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअसवर होते. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटेपासून दिल्ली विमानतळावर शून्य दृश्यमानतेसह खूप दाट धुके पसरले आहे. Delhi fog

Delhi Fog : कॅट ३ लँडिंग सिस्टम म्हणजे काय ?  

जेव्हा विमानतळावर धावपट्टीची दृश्यमानता पातळी कमी असते. तेव्हा ही प्रणाली लँडिंगमध्ये मदत करते. कॅट ३ लँडिंग कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत विमानांना सुरक्षितपणे उतरण्याची परवानगी देते. हवामानाशी संबंधित घटकांमुळे उड्डाणे वळविण्याची किंवा रद्द करण्याची आवश्यकता कमी करते. यामुळे उड्डाणाला उशीर होत नाही आणि त्यातील व्यत्यय कमी होऊ शकतात.

#WATCH | Delhi: Dense fog engulfs the National Capital as temperature dips further.
Drone visuals from Munirka, shot at 7:30 am. pic.twitter.com/XomanRtvp9
— ANI (@ANI) December 25, 2023

हेही वाचा 
 

Cold Wave grips Delhi-NCR : दिल्लीतील थंडीमुळे नागरिकांना प्रदूषणाचा धोका; श्वसनासह डोळ्यांच्या तक्रारीत वाढ
Manish Sisodia news : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाही; न्यायालयीन कोठडीत वाढ
AI चा फटका! Paytm ने १ हजार कर्मचार्‍यांना दिला नारळ

The post दिल्ली विमानतळावर दाट धुक्यांमुळे विमान उड्डाणे प्रभावित appeared first on Bharat Live News Media.

Go to Source