ख्रिश्चन समुदाय गरीब आणि वंचितांच्या सेवेत आघाडीवर : PM मोदी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चन समाजातील अनेक नेते सहभागी झाले होते. समाजाला योग्य मार्ग दाखविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ख्रिश्चन समुदाय गरीब आणि वंचितांच्या सेवेत आघाडीवर, असे प्रतिपादन आज (दि.२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ख्रिसमस निमित्त नवी दिल्लीत ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ख्रिश्चन समुदायाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध
ख्रिश्चन समुदायाशी माझे नाते खूप जुने आहे. माझे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यांना भेटत असे, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
पोप यांच्याशी भेट एक अविस्मरणीय क्षण
काही वर्षांपूर्वी मला पवित्र पोप यांना भेटण्याची संधी मिळाली होती. हा माझ्यासाठी खरोखरच एक अविस्मरणीय क्षण होता. आम्ही सामाजिक एकोपा, जागतिक बंधुता, हवामान बदल आणि सर्वसमावेशक विकास यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
#WATCH | Delhi: At an event with members of the Christian community on the occasion of Christmas, PM Modi says, “A few years ago, I had the opportunity to meet the Holy Pope. It was indeed a very memorable moment for me. To make the world a better place, we discussed issues like… pic.twitter.com/lfPPffg0zw
— ANI (@ANI) December 25, 2023
हेही वाचा :
PM Modi : भाजपचे टार्गेट ठरलं: लोकसभेसाठी ३०३+ जागा जिंकण्याचे पीएम मोदींचे कार्यकर्त्यांना आवाहन
PM Modi On Opposition’s: संसद सुरक्षा भंग प्रकरणात विरोधकांकडुन आरोपींचे समर्थन दुर्दैवी-पंतप्रधान
PM Modi advices BJP MPs: PM मोदींचा भाजप खासदारांना कानमंत्र, “विरोधकांच्या टीकेला…”
The post ख्रिश्चन समुदाय गरीब आणि वंचितांच्या सेवेत आघाडीवर : PM मोदी appeared first on Bharat Live News Media.