दुर्दैवी! अपघातस्थळी जाताना कुटुंबातील आणखी चौघांना मृत्यूने गाठले

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात दोन रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२५) पहाटे घडली. पहिल्या अपघातात घरातील एका सदस्याचा अपघात झाला. ही माहिती मिळताच कुटुंबातील सात जण अपघातस्थळी जाताना त्यांचे वाहन एका तेलाच्या टँकरला धडकून ४ जण ठार झाले. Telangana Accident यातील तिघांचा जागीच मृत्यू … The post दुर्दैवी! अपघातस्थळी जाताना कुटुंबातील आणखी चौघांना मृत्यूने गाठले appeared first on पुढारी.

दुर्दैवी! अपघातस्थळी जाताना कुटुंबातील आणखी चौघांना मृत्यूने गाठले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात दोन रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२५) पहाटे घडली. पहिल्या अपघातात घरातील एका सदस्याचा अपघात झाला. ही माहिती मिळताच कुटुंबातील सात जण अपघातस्थळी जाताना त्यांचे वाहन एका तेलाच्या टँकरला धडकून ४ जण ठार झाले. Telangana Accident
यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. Telangana Accident
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री निदामानूर मंडलातील वेंपहाडजवळ झालेल्या पहिल्या अपघातात एका पादचाऱ्यासह दोघांचा मृत्यू झाला. केशवुलु (वय २८) हे मिरयालागुडा येथून मोटारसायकलवरून पेड्डापूरकडे जात होते. यावेळी त्यांनी सैदुलू (वय ५५) या पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात दोघांनाही जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच केशवुलू यांच्या कुटुंबातील सात सदस्य सोमवारी पहाटे एका वाहनातून अपघातस्थळी जात होते. यावेळी त्यांचे वाहन तेलाच्या टँकरला आदळले.
यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. रामावत गनैया (४०), पांडिया (४०), बुज्जी (३८) आणि नागराजू (२८) अशी मृतांची नावे आहेत. इतर तिघे जखमी झाले असून त्यांना मिर्यालागुडा एरिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

Six killed in separate road accidents in Telangana
Read @ANI Story | https://t.co/Vn8M6WKuJQ#Telangana #Accident pic.twitter.com/9IOvvz0aQf
— ANI Digital (@ani_digital) December 25, 2023

हेही वाचा 

Rahul Dravid : अखेर वर्ल्डकप फायनल पराभवावर राहुल द्रविड यांनी सोडले मौन, “हे हृदयद्रावक…”
राहुल गांधींनी हिंदू आणि हिंदी भाषिकांविरोधात नसल्‍याचे सिद्ध करावे : ‘बीआरएस’ नेत्‍या के कवितांचे आव्‍हान
Covid-19 चा नवीन व्हेरिएंट डिसेंबरमध्येच का येतो?, तज्ज्ञांनी सांगितले कारण

Latest Marathi News दुर्दैवी! अपघातस्थळी जाताना कुटुंबातील आणखी चौघांना मृत्यूने गाठले Brought to You By : Bharat Live News Media.