Accident news : डंपरची कारला धडक; पतीचा मृत्यू, पत्नीसह मुलगी जखमी

पौड : पुढारी वृत्तसेवा :  भरधाव डंपरने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत कारमधील पतीचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी व दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. मुठा खिंडीतील पारधीबुवा येथे रविवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. विक्रांत अण्णा निकटे (वय 28) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. तर त्याची पत्नी … The post Accident news : डंपरची कारला धडक; पतीचा मृत्यू, पत्नीसह मुलगी जखमी appeared first on पुढारी.

Accident news : डंपरची कारला धडक; पतीचा मृत्यू, पत्नीसह मुलगी जखमी

पौड : Bharat Live News Media वृत्तसेवा :  भरधाव डंपरने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत कारमधील पतीचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी व दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. मुठा खिंडीतील पारधीबुवा येथे रविवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. विक्रांत अण्णा निकटे (वय 28) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. तर त्याची पत्नी वैष्णवी व दीड वर्षाची मुलगी (तिघेही रा. पिरंगुट, ता. मुळशी) गंभीर जखमी झाले.
विक्रांत हा पत्नी वैष्णवी व मुलीसह मुठा खोर्‍यातील वांजळे या त्यांच्या सासुरवाडीला कारमधून गेले होते. मुठा खिंडीतील पारधीबुवा या ठिकाणी पुण्याच्या दिशेकडून भरधाव आलेल्या डंपरने समोरून विक्रांतच्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये विक्रांतचा जागीच मृत्यू झाला, वैष्णवी व मुलगी गंभीर जखमी झाले. या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पौड पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Latest Marathi News Accident news : डंपरची कारला धडक; पतीचा मृत्यू, पत्नीसह मुलगी जखमी Brought to You By : Bharat Live News Media.