विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार कोण? : अजित पवारांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क :  विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण? असा सवाल करत मागील निवडणुकावरुन दिसून येते की, पंतप्रधानपदासाठी अनेक निकष असतात. हे सर्व निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे नरेंदॅ मोदी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२५)  माध्‍यमांशी बाेलताना सांगितले. (Ajit Pawar on Pm) पंतप्रधानपदासाठी दुसरा कुठला योग्य … The post विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार कोण? : अजित पवारांचा सवाल appeared first on पुढारी.

विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार कोण? : अजित पवारांचा सवाल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण? असा सवाल करत मागील निवडणुकावरुन दिसून येते की, पंतप्रधानपदासाठी अनेक निकष असतात. हे सर्व निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे नरेंदॅ मोदी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२५)  माध्‍यमांशी बाेलताना सांगितले. (Ajit Pawar on Pm)
पंतप्रधानपदासाठी दुसरा कुठला योग्य पर्याय नाही
विरोधी पक्षातील पंतप्रधान कोण आहे? याबाबतील कोणतीही स्पष्टता अद्याप नाही. जनेतेने देखील ठरावायचे आहे तुम्हाला मोदी पाहिजेत की आणखी कोण व्यक्ती?. देशात नरेंद्र माेदी यांच्‍याशिवाय पंतप्रधानपदासाठी दुसरा कुठला योग्य पर्याय नाही. पंतप्रधानपदासाठी मोदी हेच योग्य उमेदवार आहेत, असा पुन्‍नरुच्‍चाहरी त्‍यांनी केला.  (Ajit Pawar on Pm)
Ajit Pawar on Pm: माझ्या भाषणावर तुम्ही टीकाटिप्पणी करू शकत नाही
मतदारांशी काय बोलायचं तो माझा अधिकार आहे. माझ्या भाषणावर तुम्ही टीकाटिप्पणी करू शकत नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करायचे आणि मतदारांना काय सांगायचं हा माझा अधिकार आहे. म्हणून ज्यांना माझ्या बरोबर यायचे आहे त्यांनी यावं. ज्यांना दुसऱ्या बाजूला जायचे आहे, त्यांनी बिनधास्‍त जावे; पण यामध्ये कोणताही दुटप्पीपणा करू नका, असेही या वेळी अजित पवार म्‍हणाले.
काेरानाचा नवीन व्हेरिएंट धोकादायक नाही; घाबरू नका, काळजी घ्या
कोरोनाच्या परिस्थितीवर बोलताना अजित पवार म्हणाले, आमच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट धोकादायक नाही. त्‍याची तीव्रता कमी असल्याने घाबरून जाऊ नका काळजी घ्या, असे आवाहनही अजित पवारांनी यावेळी केले.
अजित पवारांचे खा. डाॅ. अमाेल काेल्‍हेंना खुले आव्‍हान
 शिरूर लाेकसभा मतदारसंघाबाबत उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२५) माध्‍यमांशी बाेलताना  माेठे विधान केले. यावेळी त्‍यांनी राष्‍ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार अमाेल काेल्‍हे यांना आव्‍हान देत यांच्‍यावर सडकून टीकाही केली. तसेच आम्ही ३ पक्ष मिळून पुढील निवडणूका लढणार असल्याचे अजित पवार  म्हणाले.
‘त्या’ खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं
अजित पवार म्‍हणाले की, “शिरुर मतदारसंघातील विद्यमान खासदाराने पाच वर्ष त्याच्या मतदार संघात लक्ष दिले असते तर खूप बरे झाले असते. शरद पवार गटातील तो खासदार गेल्या दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता. मला राजीनामा द्यायचा आहे, असे त्‍याने सांगितले हाेते. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जीवाचं रान केलं हाेते. त्यामुळे आता त्या खासदाराने आम्हाला शिकवू नये.”
शिरूर मतदार संघात महायुतीचा उमेदवार निवडून आणणारच
आगामी लाेकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार व्‍यक्‍त करत अजित पवार यांनी यावेळी कोल्हे यांच्या अभिनयाचे कौतुक देखील केले.
हेही वाचा:

मी जे करतो ते कोणीही मायचा लाल करू शकत नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
मनोज जरांगे यांचे अजून अण्णा हजारे झालेले नाहीत : डॉ. कुमार सप्तर्षी
Nashik News : अंबड, सिडकोवासीय पासपोर्ट काढण्यात अग्रेसर, परदेशवारीसह शिक्षणासाठी संख्या अधिक

 
Latest Marathi News विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार कोण? : अजित पवारांचा सवाल Brought to You By : Bharat Live News Media.