लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना पकडले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अपघात प्रकरणात जप्त केलेले वाहन परत करण्यासाठी एकाकडे 40 हजारांची लाच मागणार्‍या मंचर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संतोष सुरेश साळुंके (वय 45), पोलिस शिपाई संदीप भीमा रावते (वय 36) … The post लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना पकडले appeared first on पुढारी.

लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना पकडले

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : अपघात प्रकरणात जप्त केलेले वाहन परत करण्यासाठी एकाकडे 40 हजारांची लाच मागणार्‍या मंचर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संतोष सुरेश साळुंके (वय 45), पोलिस शिपाई संदीप भीमा रावते (वय 36) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदार तरुणाविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात अपघातप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तरुणाचे वाहन जप्त केले होते. वाहन परत करण्यासाठी साळुंके आणि रावते यांनी तरुणाकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तडजोडीत आठ हजार रुपये मान्य केले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सापळा लावण्यात आला. तरुणाकडून लाच घेणार्‍या पोलिस शिपाई रावते याला पकडण्यात आले. चौकशीत साळुंकेने रावते याच्यामार्फत लाच स्वीकारल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव, पोलिस निरीक्षक विद्युलत्ता चव्हाण यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा :

मी जे करतो ते कोणीही मायचा लाल करू शकत नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
महत्त्वाची बातमी ! लसीकरणापासून वंचित मुलांसाठी ’कॅच अप’

Latest Marathi News लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना पकडले Brought to You By : Bharat Live News Media.