फ्रान्समध्ये अडकलेल्या ३०३ भारतीयांना मोठा दिलासा, रवाना होण्यास परवानगी
Bharat Live News Media ऑनलाईन : ३०३ भारतीय प्रवाशांना घेऊन निकारागुआला जाणारे विमान फ्रान्समध्ये (France) मानवी तस्करीच्या (human trafficking) संशयावरून थांबवण्यात आले होते. दरम्यान, या विमानाला पुढच्या प्रवासासाठी निघण्यास सोमवारी परवानगी देण्यात आली. याबाबतचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. यामुळे विमानातील भारतीय प्रवाशी आज फ्रान्समधून रवाना होण्याची शक्यता आहे.
३०३ भारतीयांना घेऊन जाणारे विमान फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी थांबवल्यानंतर ते आता तीन दिवसांनी रवाना होण्यासाठी परवानगी देण्यात आली. पण, हे विमान भारतात येणार की ते निकारागुआला जाणार, हे स्पष्ट झालेले नाही.
फ्रेंच न्यूज ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन आणि रेडिओ नेटवर्क BFM TV ने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्सच्या न्यायमूर्तींनी प्रक्रियेतील अनियमिततेमुळे सुमारे ३०० प्रवाशांच्या प्रश्नी सुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, ३०३ प्रवाशांमध्ये सोबत नसलेले ११अल्पवयीन होते. या प्रवासादरम्यान दोन प्रवाशी इतरांपेक्षा वेगळे असल्याची शंका होती. ते कोणत्या उद्देशाने जात होते, हे तपासण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या अटी आणि उद्देश पडताळण्यासाठी त्यांची चार न्यायाधीशांनी रविवारी विचारपूस केली होती.
फ्रान्सच्या मार्ने ईशान्य विभागानुसार, ए ३४० हे रोमानियन कंपनीचे लीजेंड एअरलाइन्सद्वारे चालवले जाणारे विमान गुरुवारी लँडिंगनंतर व्हॅट्री विमानतळावरच थांबवण्यात आले होते”. व्हॅट्री विमानतळ पॅरिसच्या पूर्वेला १५० किलोमीटर अंतरावर आहे.
३०३ भारतीयांच्या मानवी तस्करीप्रकरणी फ्रान्सने रुमानियाचे विमान ताब्यात घेतले होते. त्यावेळी पोलिस चौकशीत मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला होता.
पॅरिसमधील पब्लिक प्रॉसिक्युटरने दिलेल्या माहितीनुसार, या विमानातून मानवी तस्करी केली जात असल्याची टीप्स मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विमानाची तपासणी केली. त्यानंतर विमानातून ३०३ भारतीयांची मानवी तस्करी करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे हे विमान ताब्यात घेण्यात आले होते. गुरुवारी या विमानाने दुबईतून उड्डाण केले होते.
विमानातील प्रवाशांची अवस्था पाहिल्यानंतर मानवी तस्करीचा संशय आला होता. या विमानातून ३०३ भारतीयांना घेऊन निकारागुआकडे नेण्यात येत होते. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. व्हॅट्री विमानतळावरील स्वागत कक्षाला प्रतीक्षा कक्ष बनविण्यात आले होते. या ठिकाणी प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. (France)
संबंधित बातम्या
३०३ भारतीयांच्या मानवी तस्करीचा संशय, विमान फ्रान्सच्या ताब्यात
झेक प्रजासत्ताक हादरले! विद्यापीठातील गोळीबारात १४ ठार, दुखवटा जाहीर
हत्येच्या संशयामुळे ४८ वर्षे काढावी लागली जेलमध्ये, आता निर्दोष
Latest Marathi News फ्रान्समध्ये अडकलेल्या ३०३ भारतीयांना मोठा दिलासा, रवाना होण्यास परवानगी Brought to You By : Bharat Live News Media.