आता वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव; नवीन महिला धोरणात जन्मदात्रीचा सन्मान

मुंबई : दिलीप सपाटे : राज्याच्या नवीन महिला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या धोरणानुसार आता कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे सक्तीचे होणार आहे. हे धोरण जाहीर होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दोनवेळा महिला धोरणाचा मसुदा सादर करण्यात आला. मात्र, पहिल्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दादा … The post आता वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव; नवीन महिला धोरणात जन्मदात्रीचा सन्मान appeared first on पुढारी.

आता वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव; नवीन महिला धोरणात जन्मदात्रीचा सन्मान

मुंबई : दिलीप सपाटे : राज्याच्या नवीन महिला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या धोरणानुसार आता कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे सक्तीचे होणार आहे. हे धोरण जाहीर होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दोनवेळा महिला धोरणाचा मसुदा सादर करण्यात आला. मात्र, पहिल्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दादा भुसे आदींनी सुधारणा सुचविल्याने हे धोरण अधिवेशनात जाहीर होऊ शकले नाही. मात्र, दुसऱ्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.
आतापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख कायद्याने करणे बंधनकारक होते; पण जन्मदात्या आईच्या नावाचा उल्लेख करणे सक्तीचे नव्हते. मात्र, नव्या महिला धोरणात वडिलांच्या आधी आईच्या नावाचा उल्लेख सक्तीचा असेल. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी हा महिला धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे मांडला. त्या स्वतः कायम आईचे नाव प्रथम आणि नंतर वडील सुनील तटकरे यांचे नाव लावत आल्या आहेत. त्यांच्या मंत्री दालनाची पाटीही ‘आदिती वरदा सुनील तटकरे’ अशी आहे. आता राज्यात या धोरणानंतर अशीच पाटी आणि असेच नाव लिहावे लागेल. ज्यामुळे मातृशक्तीला एक सन्मान मिळणार आहे. मात्र, या धोरणाची राज्य सरकारला काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल.
याशिवाय या धोरणात उद्योगात ३० टक्के महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचे लाभ, सर्व रस्त्यांवर २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
महिलांसाठी मालमत्ताविषयक सवलती, घरून काम करण्याचा पर्याय तसेच मातृत्व आणि पितृत्व रजेची सवलत मिळण्यावरही भर देण्यात आला आहे.
हेही वाचा : 

एक आई, दोन गर्भ अन् निरोगी जुळ्यांचा जन्म!
आरोग्य विभागात 11 हजार पदे भरणार : तानाजी सावंत

 
Latest Marathi News आता वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव; नवीन महिला धोरणात जन्मदात्रीचा सन्मान Brought to You By : Bharat Live News Media.