काळजी घ्या ! आगामी दोन दिवस राहणार थंडीचा जोर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रविवारी राज्यात चंद्रपूर व पुणे शहरांत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर 12.2, तर पुणे शहराचा पारा 12.3 अंशांपर्यंत खाली आला होता. दरम्यान, आगामी दोन दिवस राज्यात थंडीचा जोर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारपासून राज्यातील बहुतांश भाग गारठण्यास सुरुवात झाली. रविवारी त्यात आणखी दोन अंशांनी घसरण झाली. … The post काळजी घ्या ! आगामी दोन दिवस राहणार थंडीचा जोर appeared first on पुढारी.

काळजी घ्या ! आगामी दोन दिवस राहणार थंडीचा जोर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा :  रविवारी राज्यात चंद्रपूर व पुणे शहरांत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर 12.2, तर पुणे शहराचा पारा 12.3 अंशांपर्यंत खाली आला होता. दरम्यान, आगामी दोन दिवस राज्यात थंडीचा जोर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारपासून राज्यातील बहुतांश भाग गारठण्यास सुरुवात झाली. रविवारी त्यात आणखी दोन अंशांनी घसरण झाली. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात गेल्या पंधरा दिवसांपासून सक्रिय असल्याने तेथील किमान तापमान 4 ते 8 अंशावर आहे. दक्षिण भारतात अजूनही पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती आहे. या वातावरणाचा परिणाम राज्यावर होऊन किमान तापमानात घट होत आहे.
रविवारचे किमान तापमान
चंद्रपूर 11.2, पुणे 11.3, छत्रपती संभाजीनगर 11.8, बीड 12, जळगाव 12.6, परभणी 12.2, अकोला 13.3, गोंदिया 12.2, नागपूर 13.2, नाशिक 13.6, वाशिम 12, वर्धा 13, यवतमाळ 12.2, सांगली 14.2, सातारा 13.4, सोलापूर 15.9, कोल्हापूर 16.3, महाबळेश्वर 15, धाराशिव 15.4, नांदेड 15.
Latest Marathi News काळजी घ्या ! आगामी दोन दिवस राहणार थंडीचा जोर Brought to You By : Bharat Live News Media.