गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा– गरम पाणी अंगावर पडून गंभीररीत्या भाजलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मखमलाबाद रोडवरील चेतना पार्क अपार्टमेंट येथे ही दुर्दैवी घटना घडली. अक्षदा नवनाथ ठाकरे (दीड वर्षे) असे चिमुकलीचे नाव आहे.
बुधवारी (दि.२०) दुपारी तीनच्या सुमारास अक्षदाच्या घरच्यांनी कपडे धुण्यासाठी पाणी गरम करून बाथरूममध्ये ठेवले होते. नेहमीप्रमाणे अक्षदा बाथरूममध्ये पाणी खेळत होती. त्यावेळी तिने गरम पाण्याचे पातेल्यासोबत खेळली. त्यावेळी गरम पाणी अंगावर पडल्याने ती गंभीररीत्या भाजली. तिला वडिलांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अक्षदाचा शनिवारी (दि.२३) मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
Natural Farming : नैसर्गिक शेतीकडे वाढता कल
नागपूर : मेंढेपठार अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ, एकूण सात मृत्यू
—–
Latest Marathi News गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
