अनेक आजारांना दूर ठेवते अंजीर

नवी दिल्ली : अंजीराची गोड चव, त्याचा मधाळ गाभा अनेकांना आवडतो. अंजीर हे फळ ते ताजे असताना आणि वाळवूनही खाल्ले जात असते. अंजीरमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी-6, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅगनीज यांचा समावेश होतो. तसेच यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते.
अंजीराचे हे काही लाभ :
रक्तदाब नियंत्रण : अंजीर नियमित खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. अंजीरमध्ये आढळणारे फायबर आणि पोटॅशियम दोन्ही उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात. याशिवाय अंजीरामध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड्स आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित करतात.
हाडे मजबूत ठेवते : अंजीरामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि या सर्व गोष्टी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक मानल्या जातात. कॅल्शियमने समृद्ध असलेले अंजीर हाडे मजबूत बनवण्यास मदत करतात, ज्यामुळे हाडे फ्र्रॅक्चरचा धोका कमी होतो.
दम्याच्या रुग्णाला आराम : अंजीर दम्यापासून बचाव करण्यासही मदत करते. अंजीर खाल्ल्याने शरीरातील श्लेष्मल त्वचेला आर्द्रता मिळते आणि कफ साफ होतो, ज्यामुळे दम्याच्या रुग्णाला आराम मिळतो. अंजीरमधील घटक फ्री रॅडिकल्सशी लढतात. जर मुक्त रॅडिकल्स शरीरात राहिले तर ते दमा अधिक तीव्र करू शकतात.
हृदयाचे रक्षण : शरीरात फ्री रॅडिकल्स तयार झाल्यामुळे हृदयातील धमन्या ब्लॉक होतात आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ लागतात. अशा स्थितीत अंजीरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म हे फ्री रॅडिकल्स नष्ट करून हृदयाचे रक्षण करतात. याशिवाय अंजीरमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड्स असतात, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
पचनसंस्था निरोगी राहते : अंजीराचे पाणी डिटॉक्स ड्रिंकचे काम करते. यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायल्याने मल जाण्याची प्रक्रिया सुलभ होते. याशिवाय हे पाणी आतड्यांचे आरोग्यही सुधारते.
Latest Marathi News अनेक आजारांना दूर ठेवते अंजीर Brought to You By : Bharat Live News Media.
